शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; सांयकाळी ५ नंतरही दूकाने सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 10:52 IST

Lockdown in Akola जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित सायंकाळ ५ वाजतानंतरही अनेक दुकाने सुरूच असल्याचे दिसूून येत आहे.

अकाेला : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवारी संपूर्ण संचारबंदीचा आदेश दिला असून, इतर दिवशी दरराेज सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजतापर्यंत सर्व बाजारपेठ खुली ठेवता येणार आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित सायंकाळ ५ वाजतानंतरही अनेक दुकाने सुरूच असल्याचे दिसूून येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार संपूर्ण संचारबंदीचा आदेश दिला आहे. तसेच इतर दिवशी बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी आहे. सोमवार ते शुक्रवार या दरम्यान, सकाळी ९ ते सायंकाळ ५ वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत; मात्र शहरात ५ वाजतानंतरही दुकाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच बाजारपेठेत गर्दी वाढली असून, कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित दुकानचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

बाजारपेठेत वाढली गर्दी; नियमांचे उल्लंघन!

व्यावसायिकांची अडचण लक्षात घेता अटी व शर्थींवर बाजारपेठ खुली ठेवण्याचे आदेश आहेत; मात्र बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. तसेच दुकानात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे. ग्राहकांसह दुकानचालक विनामास्क दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे.

 

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची गरज!

प्रतिबंधित वेळेतही बाजारपेठेत दुकाने सुरू असल्याने या दुकानांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक