शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाईच्या मागणीसाठी उरळ शेतकरी पुत्रांचे मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:48 IST

उरळ (अकोला) : बोंडअळीने झालेल्या नुकसानीची मदत तसेच कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी उरळ येथील दोन शेतकरी पुत्र २१ आॅगस्ट रोजी सकाळी गावातील मोबाइल टॉवरवर चढले.

ठळक मुद्देउरळ गावातील शेतकºयांना मदत दिली जात नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा या युवकांनी दिला आहे. शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही युवक सायंकाळी ५ वाजता टॉवरवरून खाली उतरले.

उरळ (अकोला) : बोंडअळीने झालेल्या नुकसानीची मदत तसेच कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी उरळ येथील दोन शेतकरी पुत्र २१ आॅगस्ट रोजी सकाळी गावातील मोबाइल टॉवरवर चढले. जोपर्यंत उरळ गावातील शेतकºयांना मदत दिली जात नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा या युवकांनी दिला आहे. गोपाल अंबादास पोहरे आणि गणेश वामन पोहरे अशी या युवकांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी बोंडअळीची मदत येत्या १५ दिवसात शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही युवक सायंकाळी ५ वाजता टॉवरवरून खाली उतरले.गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना शासनाने मदतीची घोषणा केली होती. अनेक गावांना मदतीचे वितरण झाले; मात्र उरळ गावातील एकाही शेतकºयाला मदत मिळाली नाही, तसेच कर्जमाफीचाही लाभ शेतकºयांना मिळाला नाही, त्यामुळे गावातील गोपाल पोहरे आणि गणेश पोहरे यांनी आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही शेतकरी पुत्र सकाळी ११ वाजता गावातील मोबाइल टॉवरवर चढले, तसेच आपल्या मागण्यांविषयी पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी जोपर्यंत आश्वासन देणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा दिला. घटनेची माहिती मिळताच उरळचे ठाणेदार सतीश पाटील यांनी आपल्या सहकाºयांसह घटनास्थळ गाठले, तसेच उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, बाळापूरचे तहसीलदार दीपक पुंडे यांनी उरळ येथे भेट देऊन शेतकºयांच्या खात्यात मदत जमा करण्याचे आश्वासन दिले; मात्र जोपर्यंत पालकमंत्री अथवा जिल्हाधिकारी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत टॉवरच्या खाली उतरणार नसल्याचा इशारा युवकांनी दिला होता. मात्र, एसडीओ खडसे यांनी बोंडअळीची मदत येत्या १५ दिवसात शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे तसेच कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाºयांची शेतकºयांच्या शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सायंकाळी दोन्ही युवक टॉवरच्या खाली उतरले. (वार्ताहर) 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagitationआंदोलन