शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

धक्कादायक...सख्या मुलाने बापास दगडाने ठेचून मारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:50 IST

खेट्री (जि. अकोला): घरगुती वादातून सख्या मुलाने बापाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पातूर तालुक्यातील उमरा शेतशिवरात १८ एप्रिलच्या मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देसावरगाव येथील रहिवासी रामसिंग मेघा चव्हाण (४८)असे मृतकाचे नाव आहे.अंकुश रामसिंग चव्हाण असे आरोपी मुलाचे नाव आहे.१८ एप्रिलच्या मध्यरात्री अंकुशने त्याचे वडील रामसिंग यांची दगडाने ठेचून हत्या केली.

खेट्री (जि. अकोला): घरगुती वादातून सख्या मुलाने बापाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पातूर तालुक्यातील उमरा शेतशिवरात १८ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथील रहिवासी रामसिंग मेघा चव्हाण (४८)असे मृतकाचे नाव असून, ते चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सावरगाव येथील रहिवासी आहेत. अंकुश रामसिंग चव्हाण असे आरोपी मुलाचे नाव आहे.रामसिंग चव्हाण यांचे उमरा शेतशिवरात शेत आहे. शेतातील कांदा गहू भुईमूग, या पिकांवर राखण करण्यासाठी रामसिंग व त्यांचा मुलगा अंकुश हे दोघे शेतात झोपायला जात होते. गेल्या काही दिवसापासून बापलेकांमध्ये घरगुती वाद सुरू होता. बाप मुलाला नेहमी शिवीगाळ करत होता. अंकुशला पोलिस भरतीमध्ये जाण्याची इच्छा होती. पोलीस भरतीसाठी जाण्यासाठी लागणारा खर्च तो बापाला मागत होता. परंतु रामसिंग त्याची मागणी फेटाळून लावायचे. याचा राग मुलाच्या मनात होता. अखेर १८ एप्रिलच्या मध्यरात्री अंकुशने त्याचे वडील रामसिंग यांची दगडाने ठेचून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार अकोला येथे पाठविण्यात आले. याप्रकरणी बाळापूरचे उप विभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी भेट दिली.तसेच शवण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपी अंकुशलाा घटना स्थळावरूनच ताब्यात घेतले. हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPaturपातूर