शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

धक्कादायक ...चिमुकलीला पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईची जाळून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 17:53 IST

दोन वर्षीय चिमुकलीला घरातील पाण्याच्या टाकीत बूडवीले तर त्यानंतर स्वत:  जाळून घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली

अकोला : डाबकी रोडवरील गजानन नगरमधील रहिवासी एका मातेने दोन वर्षीय चिमुकलीला घरातील पाण्याच्या टाकीत बूडवीले तर त्यानंतर स्वत:  जाळून घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. या दोघीनांही परिसरातील नागरिकांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषीत केले. रुपाली इंगोले असे मातेचे नाव असून चिमुकलीचे नाव आनंदी आहे.डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन नगरातील गल्ली नंबर 2 मधील रहिवासी गिरीधर इंगोले हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी आणि दोन वर्षीय मुलगी आनंदी हे घरी होते. त्यांची मोठी मुलगी जानवी ही शेजारी खेळत होती. तर त्यांची सासू जळतन आणायला आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास रूपाली इंगोले यांनी लहाण मुलगी आनंदी हीला घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडविले. त्यानंतर रूपाली इंगोले हीने सुरुवातीला गळफास घेउन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र गळफास घेणेच त्यांना न जमल्याने काही क्षणातच त्यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. घराच्या छताला दोर लटकलेला होता तर रुपाली इंगोले हे भयावह स्थीतीत पडलेल्या असल्याचे सासू-सासरे घरी आल्यानंतर त्यांना दिसले. वेदनादायी प्रकार पाहताच त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी इंगोले यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर तातडीने डाबकी रोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून रुपालीचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला तर दोन्ही मुलींचा शोध घेण्यात येत असतांना जानवी नामक मुलगी तीथे आली मात्र दोन वर्षीय चिमुकली आनंदी दिसत नसल्याने तीचा शोध सुरु केला असता ती पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत दिसली. दोन वर्षाच्या चिमुकली आनंदीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. हा प्रकार मुलीचा खून करून आत्महत्या केल्याचा आहे की या मागील दुसरे काही कारण आहे, या संदर्भात पोलिस तपास करीत आहेत. तसेच या घटनेमागील कारणांचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी