शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ....कुऱ्हाडीने जखमी करून जिवंत जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 11:46 IST

५५ वर्षीय इसमावर दोघांनी कुºहाडी वार करून जखमी केले आणि नंतर त्याच्या शरीरावर गावठी दारू ओतून त्याला पेटवून दिले.

खेट्री : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सुकळी शेत शिवारात किरकोळ वादातून एका ५५ वर्षीय इसमावर दोघांनी कुºहाडी वार करून जखमी केले आणि नंतर त्याच्या शरीरावर गावठी दारू ओतून त्याला पेटवून दिले. त्यानंतर आरोपींनी या इसमाचा मृतदेह जवळील नाल्याच्या काठावर फेकून दिला. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली.राजाराम तुकाराम हिवराळे (५५) असे मृतकाचे नाव आहे. आरोपी विकास बाबूसिंग राठोड व मृतक राजाराम हिवराळे हे एका शेतात मजुरी करीत होते. रविवारी सायंकाळी आरोपी विकास राठोड व राजाराम हिवराळे यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यामुळे आरोपी विकास राठोड याने राजाराम हिवराळे यांच्यावर कुºहाडीने हल्ला केला. त्यांना जखमी केल्यानंतर त्याने त्यांच्या अंगावर गावठी दारू ओतून त्यांना पेटवून दिले. नंतर त्यांचा मृतदेह जवळील नाल्याच्या काठावर फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात आदिनाथ गाठेकर, पद्माकर पातोंड, किरण गवई, रावसाहेब बुधवंत, सुधाकर करवते, खत्री, संतोष जाधव, यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून गंभीर झालेल्या राजाराम हिवराळे यांना रुग्णवाहिकेद्वारे अकोला येथे उपचारासाठी पाठविले; परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीस अटक केली. रात्री उशिरापर्यंत आरोपी विकास राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.   आरोपी गुंड प्रवृत्तीचाहत्या करणारा आरोपी विकास राठोड हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याने अनेकांसोबत वाद घालून प्राणघातक हल्ले केले आहेत. त्याच्याविरुद्ध चान्नी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला