शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : पेट्रोल ओतून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 10:16 IST

शालिनी पवित्रकार यांच्या घरात घुसून पेट्रोल अंगावर टाकले व गोपाळ डाबेराव याने शालिनिला जिवंत जाळण्याच्या उद्देशाने आगपेटीची काडी पेटवून अंगावर टाकली.

ठळक मुद्देया घटनेत महिला १५ टक्के भाजल्याने जखमी झाली आहे.कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : कट्यार येथील क्षुल्लक कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेच्या अंगावर शनिवारी रात्री पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला १५ टक्के भाजल्याने जखमी झाली आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेतील तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कट्यार येथील शालिनी पवित्रकार (३५) व गोपाळ डाबेराव याची पत्नी या दोन महिलांचे कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी गोपाळ डाबेराव, विठ्ठल डाबेराव, भास्कर डाबेराव या तिघांनी संगनमत करून शालिनी पवित्रकार यांच्या घरात घुसून पेट्रोल अंगावर टाकले व गोपाळ डाबेराव याने शालिनिला जिवंत जाळण्याच्या उद्देशाने आगपेटीची काडी पेटवून अंगावर टाकली.दरम्यान, हा प्रकार शेजाऱ्यांना समजताच शेजाऱ्यांनी धाव घेऊन शालिनीच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली व भाजलेल्या शालिनीला जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला येथे उपचारासाठी दाखल केले.या घटनेत शालिनी १५ टक्के भाजली आहे. तिचा महिला अधिकाºयामार्फत व वैद्यकीय अधिकाºयाच्या समक्ष जबाब नोंदविण्यात आला. या प्रकरणात पो.हे.कॉ. सतीश सपकाळ यांच्या फिर्यादीवरून गोपाळ डाबेराव, विठ्ठल डाबेराव, भास्कर डाबेराव या तीन जणांविरुद्ध २६ जुलै रोजी कलम ४५२, ३०७, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, ठाणेदार हरीश गवळी यांनी भेट दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी