शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

धक्कादायक...राज्यातील १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:43 IST

अकोला : शासकीय कार्यालयातील अडकलेले क ाम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात लाचेची रक्कम घेताना रंगेहात अटक केलेल्या राज्यातील तब्बल १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- सचिन राऊतअकोला : शासकीय कार्यालयातील अडकलेले क ाम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात लाचेची रक्कम घेताना रंगेहात अटक केलेल्या राज्यातील तब्बल १५५ लाचखोरांचे गत एक वर्षापासून निलंबन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लाचखोरांना संबंधित विभागाने पाठीशी घालत त्यांच्या निलंबन कारवाईपासून त्यांना अभय दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली. त्याचेच फलित राज्यभर लाचखोरी करणाºया शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांवर ९३६ सापळे रचण्यात आले असून, लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्यानंतर लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयावर संबंधित विभागाकडून तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे सोडून त्यांना अभय दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यामध्ये २०१८ या एका वर्षातील १५५ लाचखोरांचे अद्यापही निलंबन झाले नसल्याचे वास्तव आहे. विभागीय चौकशी तसेच विविध कारणे समोर करून त्यांचे निलंबन थांबलेले आहे. शिक्षण खाते भ्रष्टाचाराने बरबटले!राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गत एका वर्षामध्ये लाचखोरांवर केलेल्या कारवायांमध्ये शिक्षण विभागातील सर्वाधिक म्हणजेच ३६ अधिकारी व कर्मचाºयांचे निलंबन केले नाही. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या लाचखोरीत अडकलेल्या ३३ लाचखोरांचेही अद्याप निलंबन नाही, तर भूमी अभिलेख, महसूलच्या १५ अधिकारी व कर्मचाºयांचे निलंबन झाले नसून, सहकार व पणन खात्याचे १० तर गृह विभागातील आठ अधिकारी कर्मचाºयांचे निलंबन अद्याप झाले नसल्याचे वास्तव आहे. लाचखोरीतून वाचविण्यासाठीही लाचलाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून लाचखोर अधिकारी व कर्मचाºयावर कारवाई केल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी काही वरिष्ठांनीच पुन्हा लाचेचीच मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. निलंबन टाळण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सल्ल्यावर कामकाज होत असल्याने काही लाचखोरांची विभागीय चौकशी चालू आहे. काहींना ४८ तासांपेक्षा कमी काळ तुरुंगात घालावा लागल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई टाळण्यात आली आहे; मात्र ही कारवाई टाळण्यासाठीही सेटलमेंट झाल्याची चर्चा आहे. निलंबित न केलेल्यांची विभागनिहाय आकडेवारीमुंबई - १५ठाणे - १३पुणे - १७नाशिक - ०७नागपूर - ३१अमरावती - १७औरंगाबाद - २०नांदेड - ३५

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग