शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या गळा तुझ्या गळा... संजय राऊत, हर्षवर्धन पाटील यांच्या गळाभेटीनं राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 17:28 IST

sanjay raut meet harshvarshan patil in akola: संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीनं इंदापूर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण

अकोले येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी सहकारमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची गळाभेट झाल्याने इंदापूर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. (sanjay raut meet harshvarshan patil in akola)

रविवारी अकोले (ता.इंदापूर) येथे खासदार संजय राऊत एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते.  या निमित्ताने पाटील आणि राऊत या दोघांची गळाभेट झाल्याने लोकांमध्ये राजकीय उलथापालथ होतेय की काय अशी चर्चा लोकांमध्ये रंगू लागली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत  भाजपमध्ये जाऊन त्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. या नंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची हर्षवर्धन पाटील यांनी गळाभेट घेतल्याने राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे. या भेटीवर हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टीकरण देत या भेटीमध्ये कोणताही राजकीय उद्देश नसून तालुक्यात आलेल्या पाहुण्यांची गळाभेट घेऊन स्वागत करणे ही परंपरा असल्याने यात कोणतेही तथ्य नसल्याचे  पाटील यांनी नमूद केले. 

....तर लॉकडॉउन लावावा लागेलखासदार संजय राऊत रविवारी इंदापूर तालुक्यात येत असल्याने आमचे मैत्रीचे संबंध असल्याने या निमित्ताने भेट घेण्यात आली. या बाबत खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यात कोरोना रोगाचे संकट वाढत असून याला आला अटकाव करण्याची जबाबदारी सरकार बरोबर सर्व नागरिकांची पण आहे. यात राजकारण करून काही उपयोग होणार नाही. ग्रामीण भागात लोक शिस्त पाळताना दिसत नाही. जर रुग्णांची संख्या जर वेगाने वाढली तर प्रशासनाला पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असे संकेत राऊत यांनी यावेळी दिले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAkolaअकोलाShiv Senaशिवसेना