शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शिवसेना आक्रमक; उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:00 IST

अकोला: जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी करीत शिवसेनेने ६४ गावांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी अकोट-अकोला मार्गावरील उगवा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

अकोला: खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी करीत शिवसेनेने ६४ गावांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी अकोट-अकोला मार्गावरील उगवा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता-रोको आंदोलनामुळे वाहतुक खोळंबली असून, दोन्ही बाजूंनी दोन ते तीन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.महान धरणातून खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असून, ६४ गावांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे. तरीसुद्धा संबंधित गावांना तब्बल १८ ते २० दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघ व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. महिन्यातून एकदा संबंधित गावांना पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सत्ताधारी भारिपने व जि.प. प्रशासनाने ६४ गावांना एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू न केल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मागणी मान्य न झाल्यामुळे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या नेतृत्वात सोमवारी उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जि.प. सदस्य महादेव गवळे, ज्येष्ठ नेते श्रीरंगदादा पिंजरकर, बंडू ढोरे, मुकेश मुरुमकार, विलास अनासणे, अतुल पवनीकर, ज्योत्सना चोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तोपर्यंत शिवसैनिक उठणार नाहीत!उगवा गावात पाणी पुरवठ्याची कोणतीही सुविधा नाही. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता ६४ गावांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनादरम्यान उगवा फाट्यावरून एकही शिवसैनिक जागेवरून उठणार नसल्याचा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन