महापालिकेत ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्वसाधारण सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी पंतप्रधान आवास याेजनेतील पात्र लाभार्थी व पाणीपुरवठ्याची कामे जाणिवपूर्वक प्रलंबित ठेवली जात असल्याच्या मुद्यावर शिवसेनेने प्रशासनाच्या विराेधात आंदाेलनाचा बिगुल फुंकला. महापाैर अर्चना मसने यांच्या दालनात सभेसाठी उपस्थित राहिलेल्या मनपा आयुक्त निमा अराेरा यांना सेना नगरसेवकांच्या आंदाेलनाचा सामना करावा लागला. यावेळी सेना नगरसेवकांनी हातामध्ये फलक घेउन प्रशासन व सत्तापक्षाच्या भूमिकेचा विराेध दर्शविला. आंदाेलनात नगरसेवक गजानन चव्हाण, नगरसेविका मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सपना नवले, नगरसेवक शशीकांत चाेपडे आदी सहभागी हाेते.
डुकरांची कलेवरे काेणी उचलायची?
मागील दाेन महिन्यांपासून प्रभाग क्रमांक १० मध्ये डुकरांचे मृत्यू हाेत आहेत. त्यांची कलेवरे उचलण्यासाठी मनपाकडून काेणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने नागरिकांकडून परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. अशावेळी प्रशासन म्हणून महापालिकेची जबाबदारी काय,असा सवाल सेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी उपस्थित केला.
डुकरांच्या समस्येचा बंदाेबस्त करा!
शहरात व प्रभागात माेकाट डुकरांचा सुळसुळाट झाला असून अकाेलेकर वैतागले आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला असला तरी अद्यापही ठाेस निर्णय घेण्यात आला नसल्याचा मुद्दा भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी सभेत उपस्थित केला. आयुक्तांनी डुकरांच्या समस्येचा तातडीने बंदाेबस्त करावा,अशी मागणी अजय शर्मा यांनी केली.
तक्रार करूनही अतिक्रमण जैसे थे!
प्रभाग क्रमांक १५ मध्ये मुख्य रस्त्यांसह गल्लीबाेळात नागरिकांनी अतिक्रमण थाटले. याविषयी झाेन अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केल्यानंतरही कारवाइ हाेत नसल्याची तक्रार खुद्द सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक बाळ टाले यांनी सभेत केली. त्यावर प्रत्येक तक्रारीचे निराकरण करणे शक्य हाेणार नसले तरी लवकरच कारवाइ केली जाइल,असे आश्वासन आयुक्त निमा अराेरा यांनी दिले.
...फाेटाे,टाेलेजी..