शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कापूस, सोयाबीनच्या हमीभावासाठी शिवसेनेची शेतकरी संघर्ष यात्रा; आमदार नितीन देशमुख यांची माहिती

By आशीष गावंडे | Updated: February 9, 2024 20:08 IST

शेतकऱ्यांनी काबाड कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव देण्याची जबाबदारी ही शासनकर्त्यांची असते.

अकोला: धर्माच्या तसेच जातीपातीच्या आडून राजकारण करण्यापेक्षा केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सोयाबीन व कापसाच्या हमीभावावर ठोस निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या वेदना व समस्या जाणून घेण्यासाठी शासनकर्ते सपशेल कुचकामी ठरल्यामुळेच शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने १५ फेब्रुवारीपासून जिल्हाभरात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

निसर्गाने कितीही अवकृपा केली तरीही शेतकरी हार मानत नाही. शेतकऱ्यांनी काबाड कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव देण्याची जबाबदारी ही शासनकर्त्यांची असते; परंतु शासनकर्त्यांकडूनच शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपाच्या अनेक  मोठ्या नेत्यांनी कापूस, सोयाबीन व इतर पिकांना हमीभाव मिळावा यासाठी कापूस दिंडी काढली होती. त्यावेळी सोयाबीनला सहा हजार रुपये व कापसाला आठ हजार रुपये दर मिळावा अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. आजरोजी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, असे असतानाही सोयाबीन व कापसाला हमीभाव का मिळत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढली जात असल्याची माहिती आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिली. संघर्ष यात्रेदरम्यान शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार दाळू गुरुजी, मा. आमदार हरिदास भदे, मा. आमदार संजय गावंडे, सेवकराम ताथोड शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील. पत्रकार परिषदेला वरिष्ठ नेते सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, मंगेश काळे, ज्ञानेश्वर म्हैसणे, योगेश्वर वानखडे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, संजय शेळके,शहर प्रमुख अकोला पूर्व राहुल कराळे, आनंद बनचरे ,निरंजन बंड, नितीन ताथोड आदि उपस्थित होते. 

जिल्ह्यात ५०० किलोमीटरचा पायी प्रवासशिवसेनेच्या पायदळ शेतकरी संघर्ष यात्रेला १५ फेब्रुवारीपासून मुर्तीजापुर तालुक्यातील दापुरा येथील गाडगे बाबा संस्थान मधून प्रारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यात ५०० किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर २ मार्च २०२४ रोजी शहराचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिर भागात यात्रेचा समारोप केला जाणार आहे. 

शेतांमध्ये करणार मुक्कामशेतमालाला शासन हमीभाव देत  नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही ३०० पेक्षा अधिक गावांना भेटी देणार असून यादरम्यान शेतांमध्येच मुक्काम करणार असल्याची माहिती नितीन देशमुख यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी