शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पदवीधरसाठी शिवसेनेचे धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची संमती

By राजेश शेगोकार | Updated: January 11, 2023 13:21 IST

अमरावती विभागीय मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या कोट्यात काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा शोध अखेर संपला आहे. शिवसेना बुलढाण्याचे माजी जिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे हे आता काँग्रेसच्यावतीने लढणार आहेत.

अमरावती विभागीय मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या कोट्यात काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसकडून डॉ. सुनिल देशमुख, डॉ. सुधीर ढोणे, मिलिंद चिमोटे अशा नावांची चाचपणी केली. उमेदवार ठरविण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून काथ्याकुट सुरू असून अखेर काँग्रेसने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतून उमेदवार आयात केला आहे. 

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेने दीड वर्ष आधीच तयारी सुरू केली हाेती. शिवेसनेचे नेते अनिल देसाई यांनी या मतदारसंघासाठी पदवीधर मतदार नोंदणी, बैठका अशी सर्व जबाबदारी धिरज लिंगाडे यांच्याकडे देत लिंगाडे हेच शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार असतील असे संकेत दिले होते. राज्यातील सत्तांतरानंतरही लिंगाडे हे ठाकरे गटासोबत कायम राहिले मात्र अमरावतीची जागा काँग्रेसकडे असल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार काँग्रेसच्या कोट्यात दिला आहे.

काँग्रेसने उमेदवारीचा घोळ का घातला?विधान परिषदेच्या अमरावती विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार ५ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असतानाही महाविकास आघाडीमध्ये उमेदवार ठरविण्याबाबत गोंधळ कायम होता. अमरावती मुंबई, नागपुर असे बैठकांचे सत्रा झाल्यावरही उमेदवार ठरत नव्हता. दरम्यान राष्ट्रवादी व शिवसेनेत या उमेदवारीबाबत बाेलणे झाल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिले होते. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवार कॉंग्रेसकडे घेण्याचे आधीच ठरले असावे म्हणून काँग्रेसने उमेदवारीचा घोळ सुरू ठेवल्याची चर्चा आहे.

मी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अर्ज दाखल करणार असलो तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत समन्वय आहे. - धीरज लिंगाडे

टॅग्स :AkolaअकोलाVidhan Parishadविधान परिषद