शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शिवसेना नेते आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 13:17 IST

अकोला: शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे १९ नोव्हेंबर रोजी शहरात आगमन होत आहे.

अकोला: शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे १९ नोव्हेंबर रोजी शहरात आगमन होत आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यासोबतच कुटुंबातील महिलांना साडी-चोळी देऊन बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत १५ नोव्हेंबर रोजी भूमिका स्पष्ट करतील.शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, यासाठी शिवसेना सतत आग्रही असल्याचे दिसून येते. राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने शेतकºयांप्रती भाजपाच्या धोरणावर टीकेची झोड उठवत अनेकदा मोर्चे, आंदोलने छेडल्याचे दिसून आले. सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस आदी उत्पादित मालाची हमीभावाने खरेदी करण्यासोबतच थकीत चुकारे तातडीने अदा करण्यासाठी सेनेने शासनाच्या नाकीनऊ आणल्याचे चित्र आहे. निसर्गाची अवकृपा, सततची नापिकी व शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. अशा शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे येत्या १९ नोव्हेंबर रोजी अकोला शहरात दाखल होत आहेत. यासंदर्भात मंगळवारी सह-संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, अकोला पूर्व विधानसभा महिला आघाडी संपर्क प्रमुख वैशाली घोरपडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक विश्रामगृह येथे बैठक पार पडली. बैठकीला महिला जिल्हा संघटिका माया म्हैसने, देवश्री ठाकरे, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बंडूभाऊ ढोरे, रवींद्र पोहरे, तालुका प्रमुख विकास पागृत, रवींद्र मुर्तडकर, संजय शेळके, शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकोला पूर्व) अतुल पवनीकर, हरिभाऊ भालतिलक, प्रदीप गुरुखुद्दे, नगरसेवक गजानन चव्हाण, योगेश गीते, मंजूषा शेळके, वनिता पागृत, सुनीता श्रीनिवास, मंदा देशमुख, शिल्पा ढोले, उषा गिरनाले, उषा चौधरी, युवा सेनेचे विठ्ठल सरप, उपतालुका प्रमुख गोपाल इंगळे, संजय भांबेरे, गजानन बोराडे, अर्जुन गावंडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.संपर्क प्रमुख गुरुवारी अकोल्यात!शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौºयासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत १५ नोव्हेंबर रोजी शहरात दाखल होत आहेत. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रमिलाताई ओक हॉल येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप व कुटुंबातील महिलांना साडी-चोळीचे वाटप केले जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना