शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शिवसेनेकडून सात हजार कुटुंबांना खाद्यतेलाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 11:31 IST

पातूर तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे ७ हजार ३१२ कुटुंबीयांना खाद्यतेलाच्या वाटपाला सुरुवात केली.

अकोला : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, संचारबंदीमुळे सर्वसामान्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा गरजू नागरिकांसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सरसावल्या असून, शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पातूर तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे ७ हजार ३१२ कुटुंबीयांना खाद्यतेलाच्या वाटपाला सुरुवात केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खाद्यतेलाच्या वाहनांना हिरवी झेंडी दिली.क ोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाउन’ तसेच राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. यादरम्यान कोरोनाच्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत घट येईल, अशी सरकारला अपेक्षा आहे. तूर्तास या संकटामुळे हातमजुरी करणाºया कुटुंबीयांसमोर दैनंदिन उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना जीवन जगताना संघर्ष करावा लागत असल्याची ग्रामीण भागात परिस्थिती आहे. ही बाब ध्यानात घेता ग्रामीण भागातील गरजूंना मदत करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून, शिवसेनेने खाद्यतेलाचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. बाळापूर मतदारसंघातील दुर्गम व अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाºया ७ हजार ३१२ आदिवासी कुटुंबांना खाद्यतेलाचे वितरण करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहासमोर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते खाद्यतेल घेऊन रवाना होणाºया वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, दिलीप बोचे, शहर प्रमुख (पूर्व)अतुल पवनीकर, शहर प्रमुख (पश्चिम) राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, उमेश जाधव, बबलू देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे, सुरेंद्र विसपुते, अजय जाधव (देशमुख), अजय पोहनकर, मुन्ना भाकरे, विशाल कपले, आकाश रामचवरे आदी उपस्थित होते.ग्रामीण भागात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही, याकडे लक्ष ठेवून आहोत. पातूर तालुक्यात दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांना खाद्यतेल पुरविल्या जाणार असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्यविषयक सुविधा देण्यावर भर आहे.-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख तथा आमदार शिवसेना

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेना