शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी शिरपूर ग्रामपंचायत सरसावली; गावभरात ठेवणार कचरापेट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:50 IST

कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): जैनांची काशी आणि प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या शिरपूरला स्वच्छ ग्राम बनविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सरसावले आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध उपाय केले जात असतानाच रस्त्यावर कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करणार आहे.शिरपूर जैन ही वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहेच शिवाय प्रसिद्ध तीर्थस्थळ आणि जैनांची काशी म्हणूनही देशभरात ओळखले जाणारे गावही आहे. या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे देशभरातील लाखो भाविकांचे येथे आवागमन सुरू असते. आता या तीर्थक्षेत्राचा आमुलाग्र विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत असून, देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर येथे कायम स्वच्छता राहावी म्हणून ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावभरात प्लास्टिकच्या कचरा पेट्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार पेठ, व्यापारी लाईन, धार्मिक स्थळे आदि ठिकाणी ५७ कचरापेट्या ग्रामपंचायतच्यावतीने ठेवल्या जाणार आहेत. ओला कचरा, सुका कचºयाचे स्वतंत्र संकलनगावात केवळ कचरापेट्या ठेवून स्वच्छता राखणे हाच ग्रामपंचायतचा उद्देश नसून, कचºयाची योग्य विल्हेवाट लावता यावी, कचरा विलगीकरणात अडथळा येऊ नये, तसेच भावी काळात कचरा प्रक्रियाही राबविता यावी म्हणून ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या कचरापेट्या ग्रामपंचायत ठिकठिकाणी ठेवणार आहे. यामुळे आपसूकच कचरा विलगीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन