शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जावई व साळ्याने केले युवतीचे लैंगिक शोषण; बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:31 IST

अकोला : जावई व साळ्याने संगनमताने एका १८ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याची घटना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. युवतीने रविवारी तक्रार दिल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे नागेश चिमणकर अकोल्यात येत असल्यामुळे त्याची बहिणीच्या माध्यमातून पीडित युवतीशी ओळख झाली. नागेश चिमणकर याने युवतीवर बलात्कार केला, त्यानंतर युवतीचे अश्लील छायाचित्र काढून तिचे लैंगिक शोषण सुरू केले. युवतीचे अश्लील छायाचित्र नागेशकडे असल्याची माहिती त्याचा जावई नीलेश बोरकर यांना मिळाली.

अकोला : जावई व साळ्याने संगनमताने एका १८ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याची घटना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. युवतीने रविवारी तक्रार दिल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एका वकिलाने पक्षकार महिलेवरही अत्याचार केल्याचे प्रकरण शनिवारी घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका युवतीवरील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खेर्डा येथील रहिवासी नागेश देवीदास चिमणकर याच्या बहिणीचा विवाह अकोल्यातील रहिवासी नीलेश शंकर बोरकर याच्याशी झाला होता. या विवाहानंतर नागेश चिमणकर अकोल्यात येत असल्यामुळे त्याची बहिणीच्या माध्यमातून पीडित युवतीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अशातच नागेशने पीडित युवतीला बहिणीच्या घरी कार्यक्रम असल्याचे सांगून बोलावले, त्यानंतर युवती नागेशच्या बहिणीच्या घरी आली असता तिथे कुणीही उपस्थित नव्हते. याचवेळी नागेश चिमणकर याने युवतीवर बलात्कार केला, त्यानंतर युवतीचे अश्लील छायाचित्र काढून तिचे लैंगिक शोषण सुरू केले.शेगाव येथे नेऊनही तिच्यावर बलात्कार केला. मोबाइलमध्ये असलेल्या अश्लील छायाचित्रांची धमकी देऊन त्याने युवतीचे लैंगिक शोषण सुरूच ठेवले.दरम्यान, त्याने युवतीला लग्न करण्याचेही आमिष दिले; मात्र विवाह न केल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. या वादातच युवतीचे अश्लील छायाचित्र नागेशकडे असल्याची माहिती त्याचा जावई नीलेश बोरकर यांना मिळाली. त्यानेही युवतीला छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण सुरू केले. साळा व जावई दोघांनीही पीडित युवतीचे एक ते दीड वर्ष लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावई दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी