शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

चॉकलेटचे आमीष देउन  अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण;  बँक अधिकाऱ्यास ठोकल्या बेडया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:39 IST

मुलांना चॉकलेट देण्याचे आमीष देउन त्यांचा लैंगीक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आला.

ठळक मुद्देचॉकलेटचे आमीष देउन करायचा लैंगीक चाळे.१९ फेब्रुवारीपासूनच पोलिसांनी केली चौकशी.मुलींचेही लैंगीक शोषन केल्याची माहिती आता समोर येत आहे.

अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या तसेच एका खासगी बँकेत अधिकारी म्हणूण कार्यरत असलेल्या जयप्रकाश नारायण गावंडे या नराधमाने लहाण मुलांना चॉकलेट देण्याचे आमीष देउन त्यांचा लैंगीक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आला. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीस बेडया ठोकल्या असून त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.जयप्रकाश नारायण गावंडे (५३) हा या ठिकाणी रहिवासी असून या खासगी बँकेत नोकरीला आहे. दररोज सायंकाळी बँकेतून घरी गेल्यानंतर याच परिसरातील इयत्ता सातवी ते आठव्या वर्गात शिकणाºया मुलांना ते शाळेतून घरी आल्यानंतर तो त्याच्या घरी बोलवायचा. पीडित मुलांना चॉकलेट देण्याच्या आमीषाने तसेच पैसे देण्याच्या कारणावरुन आरोपी त्यांना सुटीच्या दिवशी दुपारी तर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायंकाळी घरी बोलवायचा. त्यानंतर या मुलांसोबत अश्लील चाळे करीत होता. १९ फेब्रुवारी रोजी या तीन मुलांमधील एका पिडीत मुलाचे आजोबा सदर बँक अधिकाºयाच्या घराकडे गेले असता आरोपीच्या रूममध्ये काही मुले आरोपी सोबत झोपलेल्या अवस्थेत दिसले. या संदर्भात त्यांनी बँक अधिकाºयास जाब विचारला असता मुलांना वाईट उद्देशाने बोलत नसून त्यांना चॉकलेट किंवा इतर काही वस्तू खाण्यासाठी देत असल्याचा खुलासा आरोपीने केला. एवढेच नव्हे तर उलट मुजोरी करीत मुलाच्या आजोबासोबतच त्याने हुज्जत घातली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलांच्या नातेवाईकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. अखेर या मुलांच्या पालकांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घडलेला घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीयार्ने घेतले. सिव्हील लाईन्स पोलिसांनी पीडित मुलांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आरोपी जयप्रकाश नारायण गावंडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ पोस्को (लहान मुलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीस बेडया ठोकल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पिडीतांमध्ये मुलीहीदरम्यान जयप्रकाश नारायण गावंडे याने तीन मुलांसोबतच काही मुलींचेही लैंगीक शोषन केल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पिडीतांची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी