शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:43 IST

सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक गत काही दिवसांपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या माहितीचे संकलन सुरू आहे.

अकोला: सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक गत काही दिवसांपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या माहितीचे संकलन सुरू आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ४00 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील पदांची माहिती शासनाला सादर केली जाणार आहे.यापूर्वी शासनाने राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या पदांची माहिती मागविली होती; परंतु या माहितीमध्ये बºयाच प्रमाणात त्रुटी आणि माहितीचा अभाव असल्यामुळे माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण संचालनालयाच्या कार्यक्षेत्रात येणारी १ जानेवारी २0१६ आणि १ सप्टेंबर २0१७ रोजी मंजूर व कार्यरत पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मंजूर व कार्यरत प्रत्येक पदाची एकूण संख्या, निरंक किंवा व्यपगत पदे शिक्षकेतर संवर्गातील मंजूर पदे संख्या २0१२-१३ च्या संचमान्यतेनुसार संकलन करण्याचे काम माध्यमिक विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाकडून सुरू आहे. शाळांना तातडीने पदांची माहिती मागितली असून, माहिती संकलन झाल्यानंतर येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ही माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे.युद्धपातळीवर शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर पदांचे माहिती संकलन सुरू आहे. पदांची माहिती तातडीने पाठविण्यासंदर्भात शासनाकडून विचारणा झाली असून, आम्ही येत्या तीन ते चार दिवसांमध्ये माहितीचे संकलन करून शासनाकडे सादर करू.सतीश मुगल, अधीक्षक,वेतन व भविष्य निर्वाह निधी माध्यमिक.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र