शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसीड हल्ल्याची धमकी देणाऱ्या युवकास सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 18:57 IST

अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाºया युवकास जिल्हा सत्र न्यायालधीश मोनीका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने बुधवारी सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली एक मुलगी शिकवणी वर्गाला जात असतांना तीला रस्त्याच्या मधोमध अडवून प्रेमाची मागणी घातल्यानंतर तीने नकार देताच या अल्पवयीन मुलीच्या चेहºयावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाºया युवकास जिल्हा सत्र न्यायालधीश मोनीका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने बुधवारी सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. चंदू उर्फ नागसेन अशोक धांडे असे आरोपीचे नाव असून त्याने रस्त्यातच मुलीचा विनयभंग केला होता तर मुलीच्या आई वडीलांनाही जिवे मारण्याची धमकी दिली होती.१३ वर्षीय अल्पवयीन मुलगी २३ एप्रिल २०१३ रोजी तिच्या मैत्रीणीसोबत शिकवणी वर्गातून घरी जात असताना आरोपी चंदू धांडे याने मुलीचा पाठलाग करून तीच्यासमोर रस्त्यात गाडी आडवी के ली. त्यानंतर या मुलीचा हात धरून विनयभंग केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीला प्रेमाची मागणी घातली. आणि प्रेमास नकार दिला तर तीच्या आई-वडिलाना जीवाने मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर अल्पवयीन मुलीला तीच्या मैत्रीनीसमोरच चेहºयावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी देउन जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून खदान पोलिसांनी आरोपी चंदु धांडे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ (अ), ५०६ तसेच पॉस्को कायद्याच्या कलम ७,८,११ व १२ नुसार गुन्हा दाखल केला होता. खदान पोलिस ठाण्याचे तत्कालीन हेड कॉन्स्टेबल सुभाष पवार यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. हा खटला प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयासमोर चालल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा व सरकारी वकील राजेश अकोटकर यांनी सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने दोषी चंदू उर्फ नागसेन अशोक धांडे याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अ नुसार दोषी ठरवीले. तर कलम ५०६ अन्वये सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान केले. तर पॉस्को कायद्याच्या कलम ७,८,११ व १२ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. राजेश अकोटकर यांनी कामकाज पाहीले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय