शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विस्फोटक सामग्री नेणाऱ्या तिघांना सात वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 22:31 IST

विस्फोटक सामग्री नेणाऱ्या तिघांना सात वर्षांची शिक्षा

अकोला : पातूर मार्गे ट्रॅक्टरमधून स्फोटक जिलेटिन आणि डिटोनेटर घेऊन जाणाºया तिघांना ९ मे २००० रोजी बार्शीटाकळी पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून, तिन्ही आरोपींना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २००० मध्ये तत्कालीन एसीपी संतोष रस्तोगी यांच्याकडे बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला होता. ९ मे २००० रोजी रस्तोगी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरजे ०६६ आर ३४८१ क्रमांकाचा ट्रॅक्टर पातूर मार्गे अटकली शिवार मार्गावरून जात होता. ट्रॅक्टरचा चालक हा सीट मागे स्फोटक जिलेटिन आणि डिटोनेटर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सहकाºयांच्या मदतीने ट्रॅक्टरवर छापा टाकला होता. ट्रॅक्टरची झडाझडती घेत असताना पोलिसांना सीटच्या मागील बाजूस दोन लोखंडी पेट्यांमध्ये ८० नग जिलेटीन तसेच १५० नग डिटोनेटर आढळले होते. ट्रॅक्टर चालक रतनलाल दलाजी बेरवा (रा. ग्राम तुका भिलवारा) याची चौकशी केली असता, त्याच्याकडे स्फोटक पदार्थांचे दस्तऐवज नव्हते. स्फोटक साहित्याचे दस्तऐवज भिलवारा येथील दाडिया गावातील रहिवासी हरफूल चौधरी व रतनलाल सोहन चौधरी यांचे असल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी चालकासह इतर दोघांनाही ताब्यात घेतले होते. तिन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधिकाºयांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाची गुरुवारी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींना कलम (बी (१)मध्ये दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंड आणि कलम अ, ए मध्ये सात वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. श्याम खोटरे यांनी बाजू मांडली.
टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय