शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

 दिवसभरात सात जणांचा मृत्यू; ८७ नवे पॉझिटिव्ह, १८५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 19:21 IST

एकूण सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २३६ झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, बुधवार, ३० सप्टेंबर रोजी अकोला शहरातील चार आणि पातूर, वडद व अकोट येथील प्रत्येकी एक अशा एकूण सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २३६ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७४८२ झाली आहे. दरम्यान, बुधवारी १८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३८६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये गोकुल कॉलनी येथील सात, जठारपेठ येथील सहा, सिंधी कॅम्प येथील चार, डाबकी रोड व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन, आदर्श कॉलनी येथील दोन, मनकर्णा प्लॉट, रामदासपेठ, छोटी उमरी, राधानगर, अंबिका नगर, आळशी प्लॉट, मुर्तिजापूर, खडकी, सिरसो, हिवरखेड, फिरदोस कॉलनी, भावसारपूरा, शांती नगर, शिवसेना वसाहत, आरएलटी कॉलेज, आरएमओ हॉस्टेल, गुलजारपुरा, शास्त्री नगर, सातव चौक व अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी अकोट येथील नऊ, मुर्तिजापूर येथील आठ, बाळापूर व कोठारी येथील तीन, पारस व बोर्डी येथील दोन, जठारपेठ, गुजराती पुरा, निंबा, रणपिसे नगर, जूने शहर, बोरगाव मंजू, व्हीएसबी कॉलनी, तुलंगा, गीतानगर, श्रीराम हॉस्पीटल, डाबकी रोड, पोही, शेलू, कौलखेड व जठारपेठ येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

सात पुरुषांचा मृत्यूबुधवारी एकूण सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये डाबकी रोड, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, सिव्हील लाईन येथील ५५ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, जोगळेकर प्लॉट येथील ७५ वर्षीय पुरुष, वडद, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष, पातूर येथील ६५ वर्षीय पुरुष आणि अकोट येथील ७२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

१८५ कोरोनामुक्तबुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २४, कोविड केअर सेंटर अकोला येथून आठ, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनिक येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून तीन, आयुर्वेदीक महाविद्यालय येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, हॉटेल स्कायालार्क येथून दोन, कोविडा केअर सेंटर, हेंडज येथून पाच तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १३० अशा एकूण १८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१,३७२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,४८२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५८७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २३६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,३७२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला