शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शालेय पोषण आहार वाटपासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 15:37 IST

शालेय पोषण आहाराचे वाटप शिक्षकांकडे न देता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष किरणराव सरनाईक यांनी शिक्षणाधिकारी अकोला यांच्याकडे निवदेनाद्वारे केली.

अकोला : शिक्षकांचे काम व शिक्षण प्रणाली यामध्ये सुधारणा करून शालेय पोषण आहाराचे वाटप शिक्षकांकडे न देता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष किरणराव सरनाईक यांनी शिक्षणाधिकारी अकोला यांच्याकडे निवदेनाद्वारे केली.शालेय पोषण आहारात ज्वारी, बाजरीची भाकरी, दूध, अंडी इत्यादी वस्तूंच्या वाटपाचे कामे शिक्षकांकडे देण्यात आली आहेत. यामुळे मूळ शिक्षणाचे काम दुय्यम होऊन याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होईल. त्यामुळे शिक्षकांकडून पोषण आहार वाटपाची कामे काढून त्यांना पूर्णवेळ शैक्षणिक काम देण्यात यावे, अशी मागणी शिक्षणाधिकारी अकोला यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयात इयत्ता पाचवीसाठी १ किमी व आठवीसाठी ३ किमीची अट नवीन मराठी शाळांना मान्यता देताना कायम ठेवण्यात आली आहे; मात्र या अटींचे उल्लंघन करून अनेक शाळा काढण्यात येत आहेत. हे शासनाच्या अटींचे उल्लंघन आहे. नियम डावलून नवीन शाळांना मान्यता दिल्यास व किलोमीटरची असलेली अट न पाळल्यास याविरुद्ध अमरावती शिक्षण संघातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरनाईक यांनी निवेदनातून दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक