शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

दुष्काळ गाजविणार अधिवेशन!

By admin | Updated: December 8, 2014 01:19 IST

विरोधकांसह सत्ताधारी आमदारही करणार दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.

विवेक चांदूरकर / अकोलायावर्षी वर्‍हाडात पावसाच्या अवकृपेमुळे खरीप अन् रब्बी हंगाम हातचा गेल्याने शेतकर्‍यांना पाणीटंचाई, चाराटंचाई व नापिकी अशा तिहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे. नागपूर ये थे सोमवार, ८ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात वर्‍हाडात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी आमदारांसह सत्ताधारी आमदारही करणार आहेत. वर्‍हाडातील तीनही जिल्ह्यां तील १५ आमदारांचा भर दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यावरच राहणार आहे. शेतकर्‍यांच्या ओढवलेल्या संकटामुळे शेती व्यवसाय तर मोडकळीस आलाच, बाजारपेठही मंदावली आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक प्रभावित झाले आहेत. परिणामी शेतकर्‍यांना अनुदान द्या, त्यांना मदत करा, हीच मागणी आमदारांकडून या अधिवेशनात केली जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, बळीराम सिरस्कार, वाशिमचे राजेंद्र पाटणी, लखन मलिक यांनी या अधिवेशनात शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठीच्या प्रश्नाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे रिसोड येथील आमदार अमित झनक व बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनीही दुष्काळ हाच अधिवेशनातील आपला महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगि तले. आ. सपकाळ यांनी यावर्षी दुष्काळ तर जाहीर करा, सोबतच कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. *दुष्काळासोबतच स्थानिक प्रश्नही मांडणार वर्‍हाडातील दुष्काळासोबतच मतदारसंघातील प्रश्नही आमदार मांडणार आहेत. आ. बळीराम सिरस्कार हे एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्न निकाली निघावा, आ. रणधीर सावरकर हे पाणी पुरवठा योजना, तर रिसोडचे आमदार अमित झनक हे वाशिम जिल्ह्यातील आरोग्य खात्यात रिक्त असलेल्या पदांचा प्रश्न मांडणार आहेत. *वर्‍हाडातील विरोधक आमदार दोनच अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यात पंधरा आमदार आहेत. यापैकी केवळ चार आमदार काँग्रेस व अन्य पक्षाचे आहेत तर ११ आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. या चार आमदारांपैकी बाळापूरचे भारिप-बहुजन महासंघाचे आमदार बळीराम सिरस्कार सत्ताधार्‍यांसोबत आहेत. चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे निलंबित झाले आहेत. त्यामुळे केवळ रिसोडचे आमदार अमित झनक व बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ हे दोघेच विरोधक राहणार आहेत. *हेक्टरी २५ हजार मदतीची मागणी यावर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात नुकसानच झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आमदारांनी दुष्काळ जाहीर करण्यासोबत शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे सांगितले आहे.