शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजीवन कारावासाची शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:18 IST

अकोला: घराजवळील सात वर्षीय चिमुकल्या मुलीला खाण्याच्या गोळ्या देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नराधम आरोपीस प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.आय. आरलँड यांनी आजीवन कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अकोला: घराजवळील सात वर्षीय चिमुकल्या मुलीला खाण्याच्या गोळ्या देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नराधम आरोपीस प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.आय. आरलँड यांनी आजीवन कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.पीडित मुलीच्या आईने २४ सप्टेंबर २0१३ रोजी जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार शिवसेना वसाहतीमध्ये राहणारा आरोपी प्रदीप ऊर्फ गोलू सुरेश दांडगे (२५) याने सात वर्षीय चिमुकलीला खाण्याच्या गोळ्या देण्याचे आमिष दाखवून घरात बोलाविले आणि घराचे दार बंद करून तिच्या वयाचा विचार न करताना, शरीरसुखासाठी हपापलेल्या नराधम प्रदीप दांडगे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि ही बाब कुणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकीही आरोपीने तिला दिली होती. मुलीला रक्तस्राव झाल्यामुळे मुलीच्या आईने तिला विचारल्यावर तिने हकिकत सांगितली. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यावर आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (२) (आय), बालकांचे संरक्षण अधिनियम कायदा कलम ३(ए), ४ व कलम ५(एन), ६ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने साक्ष व पुरावे ग्राह्य मानून आरोपी प्रदीप सुरेश दांडगे याला दोषी ठरविले आणि त्याला आजीवन कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगण्याचा आदेश दिला. तसेच महाराष्ट्र लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्तीस नुकसानभरपाई अंतर्गत पीडित मुलीस ५ लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पीडित मुलीची बाजू सहायक सरकारी विधिज्ञ मंगला पांडे यांनी मांडली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेप