शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस सुटकेस आढळून आल्याने खळबळ; बॉम्बशोध पथकाकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:42 IST

अकोला: गांधी रोडवरील एका दुकानाच्या बाजूला बेवारस सुटकेस सोडून एक महिला पसार झाली. बेवारस सुटकेमुळे गांधी रोडवर एकच खळबळ उडाली.

अकोला: गांधी रोडवरील एका दुकानाच्या बाजूला बेवारस सुटकेस सोडून एक महिला पसार झाली. बेवारस सुटकेमुळे गांधी रोडवर एकच खळबळ उडाली. सुटकेसमध्ये स्फोटक पदार्थ तर नाही ना, असा संशय परिसरातील दुकानदार व नागरिकांना आल्यामुळे त्यांनी तातडीने कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बॉम्बशोध पथकाला पाचारण केले. पथकाने घटनास्थळ गाठून सुटकेसची तपासणी केली असता, ती रिकामी असल्याचे दिसून आले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.शहरातील अत्यंत वर्दळीच्या गांधी रोडवरील एका अगरबत्ती व सुगंधित भंडार दुकानाच्या बाजूला दुपारी १ वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला हातात मोठी सुटकेस घेऊन आली. या ठिकाणी काहीवेळ घुटमळत होती. त्यानंतर तिने दुकानाच्या बाजूला सुटकेस ठेवली आणि घटनास्थळावरून पसार झाली. बेवारस सुटकेस कोण ठेवून गेले, याची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. बेवारस सुटकेसमध्ये स्फोटक पदार्थ असण्याची शक्यता लक्षात घेता, श्याम डोंगरे, शंकरराव अडगावकर यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, बॉम्बशोध पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले. यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बॉम्बशोध पथकाने सुटकेसची पाहणी केली आणि सुटकेस उघडून बघितली. त्यात काहीच आढळून आले नाही. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. अनोळखी महिलेने खोडसाळ प्रकार करण्याच्या दृष्टिकोनातून ही कृती केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. सुटकेसची तपासणी पोलीस उपनिरीक्षक परदेशसिंह शिसोदे, मोहन फरकाडे, एजाज खान, प्रदीप पिंजरकर, बहाद्दूर सिरसाट व संदीप कडेल यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाBombsस्फोटकेPoliceपोलिस