शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

घर असावे घरासारखे...नकोत नुसत्या भिंती - ज्येष्ठ नागरिक दिन विशेष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:41 IST

अकोला : आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात; परंतु आता ही संकल्पना मागे पडत आहे. चार मुलांचा सांभाळ करणारे आई-वडील आता मुलांना अडगळ वाटू लागले आहेत. एक मुलगा आई-वडिलांचा सांभाळ करू शकत नाही. हे चित्र अनेकदा आजूबाजूला दिसते. घरातील ज्येष्ठांना काहीही नको असते. त्यांना केवळ हवा असतो ...

अकोला : आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात; परंतु आता ही संकल्पना मागे पडत आहे. चार मुलांचा सांभाळ करणारे आई-वडील आता मुलांना अडगळ वाटू लागले आहेत. एक मुलगा आई-वडिलांचा सांभाळ करू शकत नाही. हे चित्र अनेकदा आजूबाजूला दिसते. घरातील ज्येष्ठांना काहीही नको असते. त्यांना केवळ हवा असतो आधार, आपुलकी. घर असावे घरासारखे...नकोत नुसत्या भिंती...तेथे असावा प्रेम, जिव्हाळा...नकोत नुसती नाती....पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती; परंतु अलीकडच्या काळामध्ये ‘हम दो, हमारा एक’ ही संस्कृती रूढ झाली आणि तळहातावरील फोडाप्रमाणे मुलांना जपणाऱ्या आई-वडिलांना अडगळीत टाकले. त्यांना वृद्धाश्रमात जाण्यास भाग पाडले; परंतु आपणही उद्या वयोवृद्ध, ज्येष्ठ होणार आहोत, याची जाणीव ठेवून घरातील पिकलेल्या पानांची काळजी घ्यायला हवी, त्यांना सन्मानासह आधार द्यावा, एवढीच अपेक्षा ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आहे. (प्रतिनिधी)ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत तरतुदीया कायद्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्यांकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद आहे. कायद्याचे कलम-२ प्रमाणे पाल्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांचे रक्तसंबंधातील मुले-मुली, यामध्ये मुलगा, मुलगी, नातू, नात यांचा समावेश आहे. ज्यांचे वय ६0 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा स्त्री-पुरुष व्यक्तींना ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हणून संबोधण्यात येते. कलम ४(१) प्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक हे स्वत:च्या उत्पन्नामधून अथवा त्यांच्या मालमत्तेमधून स्वत:चा चरितार्थ चालवू शकत नाहीत, अशा व्यक्तींना चरितार्थासाठी कलम ५ प्रमाणे पालन-पोषणासाठी, निर्वाह भत्त्यासाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे अथवा संबंधित जिल्ह्यातील विभागाचे उपविभागीय अधिकारी (महसूल) तथा अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक न्यायाधीकरण यांच्याकडे अर्ज दाखल करता येईल. कायद्यांतर्गत पालकांचा सांभाळ न करणाºया पाल्यांना तीन महिनेपर्यंत तुरुंगवास आणि पाच हजार रुपयांपर्यंतच दंड किंवा दोनही शिक्षांची तरतूद आहे. कायद्यांतर्गत घडणारा गुन्हा हा दखलपात्र आहे.

एक मुलगा वडिलाला सांभाळू शकत नाही...आई-वडील चार मुला-मुलींना सांभाळतात. त्यांना मोठे करतात; परंतु त्याच मुलांपैकी एकही मुलगा आई-वडिलांना सांभाळण्यासाठी पुढे येत नाही. हा भाऊ सांभाळेल...तो सांभाळेल, असा विचार करून मुले आई-वडिलांची जबाबदारी झटकतात; परंतु तेच आई-वडील कधीच जबाबदारी झटकट नाहीत, याची जाणीव तरी मुलांनी ठेवावी. आम्हाला काही नको...चार दिवस सुख, समाधान आणि आनंदाने जगायला मिळावेत, हीच ज्येष्ठांची अपेक्षा आहे.

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना
  • आई, वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम-२00७
  • आई, वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम-२0१0
  • ६0 वर्षांंवरील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे
  • ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास भाड्यात (राज्य परिवहन महामंडळ) सवलत. (६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी)
  • संजय गांधी निराधार अनुदान योजना
  • श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक