शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

८६४ च्या पाकीटाची १४०० रुपयांना विक्री; कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल

By रवी दामोदर | Updated: May 29, 2024 15:43 IST

तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई 

रवी दामोदर, अकोला : जिल्ह्यात कपाशीचे विशिष्ट वाणाच्या बीटी बियाण्याचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे जादा दराने विक्री होत असल्याचे कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील अश्वनी ऍग्रो एजेन्सीचे प्रोप्रा. रामराव रामचंद्र पोहरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बियाण्यासाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी सेवाकेंद्रांवर रांगा लावत आहेत, परंतू बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. असे असताना ‘त्या’ वाणाच्या बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून प्रती पाकिट ८६४ रुपये मुळ किंमत असलेले १४०० रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे रंगेहात पकडले. त्यामुळे तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण यांनी तेल्हारा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील मे. अश्वनी ऍग्रो एजेन्सीचे प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथकाने केली कारवाई

मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, जि. प.चे जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनात तालुका, जिल्हा भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली. या पथकामध्ये मोहिम अधिकारी महेंद्रकुमार सालखे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, तालुका कृषि अधिकारी गौरव राऊत, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण, विस्तार अधिकारी कोमल भास्कर, कृषी सहायक प्रदीप तिवाले यांचा समावेश होता.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAkolaअकोला