मूल्यसंवर्धन कार्यक्रमासाठी शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडिओंची मुथा फाउंडेशनकडून निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 01:37 PM2020-03-04T13:37:02+5:302020-03-04T13:37:07+5:30

जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेल्या ३५० व्हिडिओ २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा मेळाव्यात सादर करण्यात आले होते.

A selection of videos created by the Mutha Foundation for the value added program! | मूल्यसंवर्धन कार्यक्रमासाठी शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडिओंची मुथा फाउंडेशनकडून निवड!

मूल्यसंवर्धन कार्यक्रमासाठी शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडिओंची मुथा फाउंडेशनकडून निवड!

Next

अकोला : शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि राज्य शासनाच्यावतीने शाळांमध्ये मूल्यसंवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजावे, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी मूल्यसंवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेल्या ३५० व्हिडिओ २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा मेळाव्यात सादर करण्यात आले होते. या मेळाव्यात शिक्षकांच्या १८ व्हिडिओंची निवड करण्यात आली. यावेळी शांतीलाल मुथा यांनी शिक्षकांचा सन्मान केला.
मूल्यवर्धन जिल्हास्तरीय मेळाव्यामधे अकोट पंचायत समितीमधील गुणिजन शिक्षिकांनी व्हिडिओच्या माध्यमातून मूल्यवर्धन कार्यक्रमाची यशस्विता मांडली. ६५० पेक्षा अधिक व्हिडिओंमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनखेड पूर्णा येथील शिक्षिका संगीता म्हैसने, जि.प. प्राथमिक शाळा कासोद वस्ती येथील शिक्षिका सोनाली उज्जैनकर, जि.प. शाळा पातोंडा येथील शिक्षिका कांचन घटाळे, जि.प. शाळा आंबोडा येथील शिक्षिका रेखा गीते, अंजुमन उर्दू शाळा अकोटसह इतर शिक्षक, शिक्षिकांनी तयार केलेले व्हिडिओंची मुथा फाउंडेशनने निवड केली आहे. एवढेच नाही तर श्याम अनकुरकार, रेखा गीते, निशिकांत भुरे, श्वेता पांडे, तृप्ती बिजवे, संध्या पांडे, आरती नाफडे, शिक्षक फैजान, कादीर, वसिउल्लाह आदी शिक्षकांनी मूल्यवर्धन पोस्टर प्रदर्शन सादर केले. शिक्षकांच्या या कल्पकतेचे शांतीलाल मुथा यांनी कौतुक केले आणि या शिक्षकांचे मूल्यसंवर्धनाचे व्हिडिओ आणि पोस्टर शाळांमध्ये जनजागृतीसाठी वापरण्यात येतील, असे स्पष्ट केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जि.प. सीईओ सुभाष पवार, शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, डॉ. वैशाली ठग, डायएटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, मुख्याध्यापक संजय सरदार उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये संगीता म्हैसने यांच्या व्हिडिओने प्रथम क्रमांक मिळविल्याने, त्यांचा सन्मान करण्यात आला. चर्चासत्रात अर्चना ढवळे-भागवत, रेखा गीते मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.

 

Web Title: A selection of videos created by the Mutha Foundation for the value added program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.