शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
2
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
3
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
4
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
5
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
6
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
7
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
8
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
9
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
10
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
11
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
12
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
13
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
14
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
15
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
16
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
17
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
18
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
19
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
20
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात वनवृध्दीसाठी हेलिकॉप्टरमधून करणार बियांचा वर्षाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 14:31 IST

अकोला : माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे विविध प्रकारच्या बियांचा वर्षाव करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे सिड बॉम्बींग पातूर येथुन मोर्णा नदीच्या उगमापासुन ते अकोला पर्यंत व अकोट, तेल्हारा भागात करण्यात येणार आहे.जिल्हयात जुन महिण्याच्या अखेरीस किंवा एक- दोन पाऊस पडल्यानंतर सिड बॉम्बींग करण्यात येणार आहे. अंजन, जामुन, आंबा, वड, पिंपळ, निंब, पेस, सिताफळ, बोर, आदी वृक्षाच्या बियांचा वापर करण्यात येणार आहे.

अकोला : दिवसेंदिवस जिल्हयातील जंगलाची वृक्षतोडीमुळे संख्या कमी होत आहे. जिल्हयाच्या एकूण क्षेत्राफळापैकी केवळ ७ टक्के भाग हा जंगलानी व्यापलेला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखता यावे यासाठी वनाचे क्षेत्रफळ वाढविणे गरजेचे आहे. यासाठी माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे विविध प्रकारच्या बियांचा वर्षाव करण्यात येणार आहे.याबाबतची आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या दालनात झाली. यावेळी माजी खासदार प्रकाश आंबेडकर , बाळापुरचे आमदार बळीराम सिरस्कार , उपविभागीय अधिकारी संजय खडसे , उपवनसंरक्षक अकोट विभागाचे गुरुप्रसाद, सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक विजय माने, जिल्हा कृषि अधिकारी ममदे यांची प्रमुख उपस्थिती होती.हेलीक्टॅप्टरमधुन बिज टाकण्याच्या प्रक्रीयेला सिड बॉम्बीग असे म्हणतात. जिल्हयात जुन महिण्याच्या अखेरीस किंवा एक- दोन पाऊस पडल्यानंतर सिड बॉम्बींग करण्यात येणार आहे. यासाठी अंजन, जामुन, आंबा, वड, पिंपळ, निंब, पेस, सिताफळ, बोर, आदी वृक्षाच्या बियांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच यात विविध वृक्षाच्या बियांसोबत जनावरांसाठी लागणा-या खादय गवतांच्या बियांचाही वापर करण्यात येणार आहे. सिड बॉम्बींग पातूर येथुन मोर्णा नदीच्या उगमापासुन ते अकोला पर्यंत व अकोट, तेल्हारा भागात करण्यात येणार आहे.या सर्व कामावर नियंत्रण जिल्हा प्रशासनाचे राहणार असुन, यासाठी लागणारा निधी जिल्हा परिषद तर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी वनविभागातर्फे वनक्षेत्राची निवड करण्यात येणार आहे. तर यासाठी नोडल आॅफिसर म्हणुन सामाजीक वनिकरण विभागाची देखरेख राहणार आहे. हा अभिनव प्रयोग यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाची समन्वय साधुन काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाforestजंगलAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय