शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

थकित वेतनासाठी महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:01 IST

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन गत सहा महिन्यांपासून थकीत असून, थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी येथील विद्युत भवन समोर धरणे दिले.

ठळक मुद्देअमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील २५१ सुरक्षा रक्षकांचे सहा महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. सहा महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अर्ज, विनंत्या करूनही हा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे अखेर या सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी विद्युत भवन येथे धरणे आंदोलन केले.

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन गत सहा महिन्यांपासून थकीत असून, थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी येथील विद्युत भवन समोर धरणे दिले.अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील २५१ सुरक्षा रक्षकांचे सहा महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. हे सुरक्षा रक्षक अकोला जिल्ह्यातील महावितरणच्या अकोला ग्रामीण व शहर विभाग, आकोट विभाग, तेल्हार, पातूर, बाळापूर, बार्शीटाकळी व मुर्तीजापूर उपविभागात कार्यरत आहेत. गत सहा महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अर्ज, विनंत्या करूनही हा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे अखेर या सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र औद्योगिक व इतर श्रमिक कामगार संघटनेच अध्यक्ष बदरुज्जमा, जिल्हाध्यक्ष राहुल वाघ, जिल्हा संघटक अशोक अबगड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंत्यांना मागणीचे निवेदनही सादर करण्यात आले. थकीत वेतन तातडीने अदा करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धरणे मंडपात जिल्हाभरातून आलेले सुरक्षा रक्षक उपस्थित होते. या आंदोलनास स्वाभीमानी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शरद खोले, प्रमोद लोडम, दिलीप दाळू, किल्लेदार, एस. एन. बावने यांनी उपस्थित राहूल पाठिंबा दर्शविला. इंटक झोनचे अध्यक्ष बी. के. मनवर यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण