शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महापारेषण अभियंत्याच्या जाचाला कंटाळून सुरक्षा रक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:36 IST

र्यकारी अभियंता गणेश देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

ठळक मुद्देमानसिक त्रासाला कंटाळून कार्यालयातील सॅनिटायझरची एक बॉटल प्राशन केली. सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील महापारेषणच्या कार्यालयातील एका सुरक्षा रक्षकाने कार्यकारी अभियंत्याच्या जाचाला कंटाळून सोमवारी सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षा रक्षकाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसानी सोमवारी रात्री उशिरा चौकशीस प्रारंभ करीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.धीरज खंडारे हे काही वर्षांपासून महापारेषणमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहेत. धीरज खंडारे यांनी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ते कर्तव्यावर असताना कार्यकारी अभियंता गणेश देशमुख यांच्या कर्मचाऱ्याने त्यांना केबिनमध्ये बोलावले. यावेळी अभियंता गणेश देशमुख यांनी तुझ्या नातेवाइकाचे निधन झाले, त्यामुळे तू सुद्धा १४ दिवस कर्तव्यावर येऊ नकोस, असे सुरक्षा रक्षक खंडारे यांना म्हटले. त्यानंतर खंडारे यांनी उत्तर देत नातेवाइकाचे निधन झाले असले तरी आम्ही कुणीही तिकडे गेलो नव्हतो. त्यामुळे १४ दिवस घरी जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले. तरीही सुरक्षा म्हणून मी वैद्यकीय तपासणी करून येतो, असे म्हटल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी धीरज खंडारे यांना शिवीगाळ केली. त्यामुळे मानसिक दडपणात आलेल्या धीरज खंडारे यांनी देशमुख यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून कार्यालयातील सॅनिटायझरची एक बॉटल प्राशन केली. त्यामुळे धीरज खंडारे यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान धीरज खंडारे यांनी आपण कार्यकारी अभियंता गणेश देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. त्यानंतर महापारेषण कार्यालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात काय चौकशी करतात, याकडे लक्ष लागले असून,ा तपासानंतर पोलिस गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला