शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंड्याच्या रुपनाथ संस्थानात स्थापित होणार देशातील दुसरी सर्वात मोठी घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 17:45 IST

The second largest bell चांदी, जस्त, साउंड पावडर, कासे, तांबे आदी धातूंनी बनविलेल्या या घंटेचे वजन ३२१ किलो आहे.

ठळक मुद्देया घंटेसाठी ३ लाख ५० हजार रुपये खर्च आला. घंटेचा ध्वनी ३ किमी पर्यंत ऐकू येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अकोला : तालुक्यातील दहीहंडा येथील रुपनाथ महाराज संस्थान येथे तब्बल ३२१ किलो वजनाची अजस्त्र घंटा  स्थापित करण्यात येत असल्याची माहिती संस्थानचे गणेश पोटे यांनी सोमवारी येथे दिली. अयोध्या येथील राम मंदिरानंतर आकार वजनात ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी घंटा असल्याचा दावा पोटे यांनी यावेळी केला.शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत या घंटेबाबत माहीत देताना पोटे म्हणाले की, ही घंटा उत्तर प्रदेशातील जनेश्वर येथे तयार करण्यात आली आहे. चांदी, जस्त, साउंड पावडर, कासे, तांबे आदी धातूंनी बनविलेल्या या घंटेचे वजन ३२१ किलो आहे. या घंटेसाठी ३ लाख ५० हजार रुपये खर्च आला असल्याचेही पोटे यांनी सांगितले. अयोध्या येथील राम मंदिरात ६२१ किलो वजनाची घंटा देशातील सर्वात मोठी असून, त्यानंतरची दुसरी सर्वात मोठी घंटा दहिहंडा येथील रुपनाथ मंदिरासाठी तयार करण्यात आल्याचे पोटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आशिष मगर,प्यारेलाल जयस्वाल आदी उपस्थित होते.

३ किमीपर्यंत घुमणार ध्वनी

या अजस्त्र घंटेची किमया म्हणजे या घंटेमधून ओंकार हा ध्वनी निर्माण होऊन तो तब्बल ३ किमी पर्यंत ऐकू येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही घंटा थेट रुपनाथ महाराज संस्थानमध्ये नेण्यात येत असून तेथे आरती व पुजा अर्चनेने या घंट्याची स्थापना करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTempleमंदिर