बुलडाणा : येथील उत्तम ज्वेलर्स आणि बोथरा ज्वलर्स या दोन सोने चांदीच्या दुकानाची आयकर खात्याच्या अकोला येथील पथकाने १९ मार्चच्या रात्री ९.३0 वाजता शोध मोहिम सुरू केली. चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना असल्यामुळे आयकर खात्याच्या वतीने विविध तपासन्या सुरू असतात. बुलडाणा येथील दोन सोने चांदीच्या दुकानाची अचानक चौकशी सुरू झाल्याने नेमका काय प्रकार आहे हे कळु शकले नाही. यासंबंधी अधिकार्यांनी सुध्दा माहिती देण्यास नकार दिला. रात्री उशिरापर्यंंत ही कारवाई सुरू होती.
बुलडाण्यात दोन ज्वेलर्सवर आयकर खात्याचा सर्च
By admin | Updated: March 20, 2015 00:52 IST