शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मिशन जिल्हा परिषदेसाठी योजनांचा धडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:55 IST

आगामी जिल्हा परिषद निवडणूक समोर ठेवून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विविध योजनांची जंत्रीच मांडली.

अकोला: जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्तरीत्या जिल्हा दौरा केला. या दौऱ्यामध्ये अनेक प्रश्न समोर आले असून, त्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनला देण्यात आले आहेत; मात्र शासनाकडून जिल्हा परिषदेला भेदभावपूर्ण वागणूक मिळत असून, पाच कोटींच्या निधीचा प्रस्ताव असताना केवळ ७० लाख मंजूर करण्यात आल्याचा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी जिल्हा परिषद निवडणूक समोर ठेवून त्यांनी विविध योजनांची जंत्रीच मांडली.जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून रमाई अपंग पेन्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५० टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग महिलांना दरमहा १ हजार रुपये पेन्शन देण्यासाठी २९ लाख रुपयांची तरतूद करण्याचा ठराव घेतला असून, असा ठराव घेणारी अकोला जिल्हा परिषद ही देशात एकमेव असल्याचा दावा त्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या बियाणे वाटप योजनेचा लाभ यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच २०२० मध्ये ‘सीड बॉम्बिंग’चा प्रयोग अकोल्याच्या डोंगरमाथ्यांवर करण्यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले असल्याचे ते म्हणाले.खारपाणपट्ट्यातील ३७७ गावांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने दिला असून, वान प्रकल्पातून पाणी पुरवठा करणारी योजना शासनाने तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली. पावसाचा अंदाज वर्तविण्याºया विविध एजन्सी या बियाणे कंपनीच्या इशाºयावर चालताता असा, आरोप आंबेडकर यांनी केला. या अंदाजावर बियाणे बाजाराची स्थिती अवंलबून असते त्यामुळे शेतकºयांची फसवूणक टाळण्यासाठी शासनाने केवळ दोनच एजन्सी अधिकृत करून इतर एजन्सीवर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली. पीक विमा हा अपघात विम्याच्या धर्तीवर असावा, अशी मागणीही त्यांनी केली. या पत्रपरिषदेला माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरिदास भदे, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोंडे, ज्ञानेश्वर सुलताने, प्रभा सिरसाट, वंदना वासनिक उपस्थित होते. डीपीसीचा ५० टक्के निधी जि.प.च्या अखत्यारीत असावाजिल्हा नियोजन समितीच्या मार्फत जिल्ह्याच्या विकास कामांचे नियोजन केले जाते. यासाठी ठरविण्यात आलेल्या निधीच्या ५० टक्के निधीचे नियोजन व खर्च याचे अधिकारी जिल्हा परिषदेला देण्याची मागणी अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर