शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

‘शाळा सिद्धी’ :  १६०० पैकी ६९ शाळांनीच केले मूल्यमापन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 15:40 IST

अकोला : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नुकताच असर २०१८ अहवाल जाहीर झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

-  प्रवीण खेतेअकोला : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नुकताच असर २०१८ अहवाल जाहीर झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. अशातच शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांची स्वयंमूल्यमापनाबाबत उदासीनता दिसून येत आहे.महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८ - १९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकरण करणे तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देशभरात शाळा सिद्धी तर महाराष्ट्रात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे अनिवार्य आहे; परंतु जिल्ह्यात यासंदर्भात शाळांची उदासीनता दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यातील १६०० शाळांपैकी केवळ ६९ शाळांनीच स्वयंसिद्धी अंतर्गत स्वयंमूल्यमापन केल्याची बाब समोर आली आहे. शाळांची ही उदासीनता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास बाधक ठरत आहे.३० जानेवारीपर्यंत मुदतशाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना आपल्या शाळेतील स्वयंमूल्यमापनासाठी ३० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळांना स्वयंमूल्यमापनासाठी केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.अशी आहे सद्यस्थितीस्वयंमूल्यमापन झालेल्या शाळा - ६९प्रक्रिया सुरू असणाऱ्या शाळा - १६०मूल्यमापनच न झालेल्या शाळा - १६१२अशी आहे कार्यपद्धतीशाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.७ क्षेत्र म्हणजे ४६ गाभा माणकेप्रत्येक गाभा मानकानुसार त्या-त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.असे आहे स्वयंमूल्यमापनशाळेतील उपलब्ध साधन, त्याची उपयुक्तता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते पर्याप्त आहे का, याची पडताळणी करून त्यानुसार गुण द्यावे लागतात. (उदा. शाळांमधील ग्रंथालयात आवश्यक पुस्तकांची संख्या, विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो का. तसेच संगणक, शिक्षकांची संख्या, शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धती आदींबाबतदेखील मूल्यमापन करून गुण द्यावे लागतात.)श्रेणीनुसार गुणश्रेणी - गुणअ - ११२ ते १३८ब - ६९ ते १११क - ६८ किंवा पेक्षा कमी गुणविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळांनी ३० जानेवारीच्या आत शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत स्वयंमूल्यमापन करावे. या संदर्भात शाळांना सूचनादेखील दिली आहे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा