शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पाेषण आहाराचा फज्जा; घरपाेच पुरवठा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:17 IST

Akola News विद्यार्थ्यांना घरपाेच पुरवठा हाेत नसल्याने स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

अकोला : महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून होणारा शालेय पोषण आहार पुरवठ्याचे कंत्राट रद्द करून २०१९-२० च्या शालेय सत्रापासून केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा शिक्षण संचालकांचा आदेश होता. कोरोनामुळे ही प्रणाली बाजूला सारत विद्यार्थ्यांना ‘पॅकिंग’द्वारे शाळेत किंवा घरपोच आहार पुरवठा करण्याचे शासनाने दिलेले निर्देश जिल्हा परिषदा, महापालिका व नगरपालिकांनी धाब्यावर बसविले आहेत. विद्यार्थ्यांना घरपाेच पुरवठा हाेत नसल्याने स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जिल्हा परिषद, महापालिका-नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया रावबून महिला बचत गटांना शालेय पाेषण आहार पुरवठ्याचे कंत्राट दिले जात होते. २०१९-२० या शालेय वर्षात पाेषण आहाराचा केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत पुरवठा करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिला हाेता. सुरुवातीला शासन स्तरावर नियुक्त केलेल्या संस्थेच्यावतीने आहाराचा पुरवठा केला जाणार होता. ही प्रक्रिया थंडबस्त्यात सापडल्यामुळे शिक्षण विभागाने स्वायत्त संस्थांच्या स्तरावर निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने स्वायत्त संस्थांनी स्थानिक पातळीवरील एजन्सी व पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या निविदा मंजूर करून त्यांना कार्यादेश दिले. २०२०-२०२१ या चालू शैक्षणिक सत्रापासून या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा सुरू होण्यापूर्वीच २३ मार्च २०२० पासून टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे आहार वाटपाचा तिढा निर्माण झाला. ही बाब ध्यानात घेता, शासनाने विद्यार्थ्यांना आहाराचा ‘पॅकिंग’द्वारे तसेच घरपाेच पुरवठा करण्याचे निर्देश जारी केले हाेते.

 

घरपाेच पुरवठा नाहीच!

टाळेबंदीच्या कालावधीत मार्च ते एप्रिल महिन्यांत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे शासनाने तांदळाच्या व्यतिरिक्त मूग व हरबरा डाळीचे ‘पॅकिंग’ करून विद्यार्थ्यांना घरपाेच पुरवठा करण्याचे निर्देश दिले हाेते. सद्य:स्थितीत इयत्ता पहिली ते चाैथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा बंदच आहे. अशा विद्यार्थ्यांना आहाराचा घरपाेच पुरवठा हाेत नसल्याचे समाेर आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा