शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:44 IST

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. उ

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. उज्जेन हसन खान हा गंभीर जखमी मुलगा इचे नगर परिसरातील जंगलात पडलेला होता. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या मुलावर हल्ला करण्याचे कारण मात्र समोर आले नाही.पातूर येथील रहिवासी अफसर खान छोटे खान यांचा मुलगा उज्जेन हसन खान हा गीता नगर परिसरातील सेंट अ‍ॅन्स शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे तो अकोल्यात रहिवासी असून, त्याच्यावर शनिवारी दुपारी अज्ञात मारेकऱ्याने चाकूने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेला मुलगा गंगा नगर परिसरातील इचे नगरजवळ असलेल्या जंगलात पडून होता. काही लोक या परिसरात गेले असता त्यांना हा मुलगा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तातडीने जुने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलाला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तो बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर परिसरातील सीसी कॅमेºयाची तपासणी सुरू केली असून, त्याच्यावर हल्ला करणारा कोण आहे, याचा शोध सुरू केला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुलावर झालेल्या हल्ल्याचे कारण समोर आले नाही; मात्र पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून, तीन पथके यासाठी कार्यरत करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात धावसदर मुलाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. या मुलावर चाकूहल्ला करणाºयाचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. यासह नागरिकांनीही जुने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात मारेकºयाचा तातडीने शोध घेण्याची मागणी जुने शहर पोलिसांकडे केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी