शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात अडकले २४ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 11:14 IST

Scholarship applications students stuck in college जिल्ह्यातील २४ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप महाविद्यालयांमध्ये अडकले आहेत.

- संतोष येलकर 

अकोला: ‘मार्च एन्डींग’ दहा दिवसांवर ठेपला असला तरी, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील २४ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप महाविद्यालयांमध्ये अडकले आहेत. अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुषंगाने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पध्दतीने समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु ‘मार्च एन्डींग’ला केवळ दहा दिवसांचा कालावधी उरला असताना, जिल्ह्यातील ३११ महाविद्यालयांकडून २४ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांमध्ये प्रलंबित असल्याने, संबंधित विद्यार्थ्यांना चालू आर्थिक वर्षातील शिष्यवृत्ती मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

विद्यार्थ्यांचे असे आहेत प्रलंबित अर्ज!

शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३११ महाविद्यालयांमध्ये २४ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ९ हजार अर्ज आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील १५ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत.

प्रलंबित अर्ज २५ मार्चपर्यंत सादर करा; महाविद्यालयांना निर्देश!

समाजकल्याण विभागाच्या अमरावती प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाचे समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी १८ मार्च रोजी अकोल्यातील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यामध्ये शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाविद्यालयांकडे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज २५ मार्चपर्यंत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे ऑनलाइन पध्दतीने सादर करण्याचे निर्देश समाजकल्याण अधिकारी जाधवर यांनी जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या संबंधित प्रतिनिधींना या बैठकीत दिले.

टॅग्स :AkolaअकोलाScholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी