शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन’चे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘थाळी बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 14:40 IST

अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे या आशयाची मागणी घेऊन ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर शनिवारी सकाळी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या वतीने पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले.गुणी व हुशार विद्याथ्यार्ची या आरक्षणा मुळे गळचेपी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.उपस्थित नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या घोषणा दिल्या.

अकोला : राज्य घटनेत आरक्षणाची मयार्दा ५० टक्के ठरवून देण्यात आली असतानाही भाजपप्रणित राज्य शासनाने संविधानाने दिलेल्या पळवाटांचा वापर करत नैतिकतेला हरताळ फासून हे आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत नेले आहे. या आरक्षणामुळे खुल्या प्रवगार्तील गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून हे अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे या आशयाची मागणी घेऊन ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर शनिवारी सकाळी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.या थाळी बजावं आंदोलनात शहरातील डॉक्टर्स ,व्यवसायिक व अनेक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक महिला पुरुष सहभागी झाले होते. या वेळी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या वतीने पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाच्या या अतिरिक्त आरक्षणामुळे गुणवत्ताधारक खुल्या विद्यार्थ्यांची गळचेपी होत असून छतीस हजार मेरिट लिस्ट नंबर असणाऱ्या विद्यार्थ्याला आरक्षणातून क२ेएम मुंबई सारख्या नामवंत महाविद्यालयात अस्थिव्यंग या नामांकित कोर्सला प्रवेश मिळाला. तर चार हजार मेरिट लिस्ट क्रमांक असणाº्या खुल्या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना कोणतीही जागा या मध्ये मिळत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. गुणी व हुशार विद्याथ्यार्ची या आरक्षणा मुळे गळचेपी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या घोषणा दिल्या. या अतिरिक्त आरक्षण संदर्भात रस्त्यावर जनजागरण करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलagitationआंदोलन