अकोल्यात किटकनाशक उत्पादककंपनीकडून सॅनिटायजर निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 06:00 PM2020-04-08T18:00:10+5:302020-04-08T18:00:17+5:30

अकोला जिल्ह्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये निर्मिती केंद्र असलेल्या कीड, किटकनाशक उत्पादक कंपनीला परवानगी देण्यात आली.

Sanitizer Production by Pesticide Producer Company in Akola | अकोल्यात किटकनाशक उत्पादककंपनीकडून सॅनिटायजर निर्मिती

अकोल्यात किटकनाशक उत्पादककंपनीकडून सॅनिटायजर निर्मिती

Next

अकोला : सध्या कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी हॅण्ड सॅनिटायजर महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या काही दिवसात नामांकित कंपन्यांचे सॅनिटायजरचा पुरवठा मागणीएवढा होत नसल्याने अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायजर विक्री सुरू झाली. त्यावर कारवाईही झाली, अकोल्यात एका किटकनाशक उत्पादक कंपनीला सॅनिटायजर निर्मितीची परवानगी महाराष्ट्रप्रदुषण नियंत्रण मंडळाने दिली असून त्याव्यतिरिक्त सुरू असलेल्या निर्मितीला कोणतीही परवानगी मंडळाने दिलेली नाही, असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अमरावती विभागाचे प्रादेशिक अधिकारी एस.डी.पाटील यांनी सांगितले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसोबतच सतत हात धुणे या दोन उपायांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे. त्यातच घराबाहेर असताना हात धुण्याची सोय नसलेल्या ठिकाणी सॅनिटायजरने हात निर्जंतूक करावे, हा उपायही सूचविण्यात आला. त्यासाठी सुरूवातीच्या काळात बाजारात उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे हॅण्ड सॅनिटायजर हातोहात संपले. तसेच अचानक वाढलेल्या मागणीएवढा पुरवठा करण्याची क्षमताही संबंधित उत्पादक कंपन्यांची नाही. त्यामुळे ऐनवेळी सॅनिटायजर निर्मिती करण्यासाठी शासनाकडून उत्पादकांना संधी देण्यात आली. त्यानुसार सॅनिटायजर निर्मिती करताना कायद्यानुसार संबंधित उद्योगाला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रीयाही ठरवून दिली आहे. आपात्कालीन परिस्थितीत अवघ्या पंधरा दिवसात संबंधितांना परवानगी दिली जाईल, असे पत्र महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव इ. रविंद्रन यांनी सर्वच प्रादेशिक अधिकाऱ्यांना २९मार्च रोजीच दिले आहे. त्यानुसार सॅनिटायजर उत्पादन करणाऱ्यांनी आॅनलाइन अर्ज करून ही परवानगी घेण्याची संधीही देण्यात आली. त्या प्रक्रीयेनुसार अकोला जिल्ह्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये निर्मिती केंद्र असलेल्या कीड, किटकनाशक उत्पादक कंपनीला परवानगी देण्यात आली. त्याशिवाय, इतर कोणीही तशी परवानगी घेतली नाही. वास्तविकपणेजलगुणवत्ता अधिनियम १९७४ मधील कलम २५, २६ तसेच हवा गुणवत्ता अधिनियमातील भाग २१ नुसार ही परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार परवानगी न घेता कुणी उत्पादन सुरू केले असेल तर ते अवैध आहे, असे प्रादेशिक अधिकारी पाटील यांनी सांगितले. - औद्योगिक वसाहतीत धडाक्यात उत्पादनअकोला औद्योगिक वसाहत परिसरात एका उद्योगाने सॅनिटायजर निर्मिती धडाक्यात सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली की नाही, याबाबत अमरावती विभाग प्रादेशिक कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसल्याने त्याची चौकशी केलीजाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

 

Web Title: Sanitizer Production by Pesticide Producer Company in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला