शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘सॅनेटरी पॅड ’ निर्मितीतून महिलांनी साधला उन्नतीचा मार्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:09 IST

व्याळा येथील महिला बचत गटाच्या महिलांनी ‘सॅनेटरी पॅड’ निर्मितीतून उन्नतीचा मार्ग साधला आहे.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मासिक पाळी, या विषयावर आजही शहरी भागातील बहुतांशमहिला थेट बोलण्यास टाळतात. ग्रामीण भागात तर या विषयावर बोलणेही कठीणच; पण याच विषयावर जनजागृती करत व्याळा येथील महिला बचत गटाच्या महिलांनी ‘सॅनेटरी पॅड’ निर्मितीतून उन्नतीचा मार्ग साधला आहे.अकोला शहरापासून जवळच असलेल्या व्याळा येथील काही महिलांनी दोन वर्षांपूर्वी योगीराज स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला केवळ पैशांची बचत म्हणून महिलांचा हा गट चालायचा; पण त्या पलिकडेही महिलांचं वेगळं जग आहे, हे जिल्हा उद्योग केंद्राच्या एका बैठकीतून या महिलांना कळलं. बचत गटाच्या माध्यमातून केवळ पैशांची बचतच नाही, तर विविध उद्योगही करणे शक्य असल्याचं समजलं. या बैठकीत महिलांना कापूस वेचणी यंत्र, चरखा, शिलाई मशीन यांसह विविध गृह उद्योगांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्याळा योगीराज स्वयंसहायता महिला बचत गटाची ‘सॅनेटरी पॅड’ निर्मिती प्रशिक्षणासाठी निवड झाली. दोन दिवसांच्या प्रशिक्षणासोबतच जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत महिला बचत गटाला सॅनेटरी पॅड निर्मितीचे यंत्र उपलब्ध करून दिले.

‘ईश्वर चिठ्ठी’ने उघडले नशीबजिल्हा उद्योग केंद्र येथे झालेल्या बैठकीत ईश्वर चिठ्ठी टाकून विविध उद्योगांच्या प्रशिक्षणासाठी महिला बचत गटांची निवड करण्यात आली. यावेळी व्याळा येथील योगीराज स्वयंसहायता महिला बचत गटाची निवड सॅनेटरी पॅड निर्मितीसाठी झाली. प्रशिक्षणानंतर या महिलांनी सॅनेटरी पॅड निर्मितीला सुरुवात केली अन् त्यांचे नशीबच उघडले.

चूल सांभाळून चालतो उद्योगबचत गटाने व्याळा गावातच एक खोली भाड्याने घेऊन सॅनेटरी पॅडच्या निर्मितीला सुरुवात केली. चार-चार महिलांचे दोन गट तयार करून एक दिवसाआड हे दोन्ही गट आळीपाळीने एक एक दिवस पॅड निर्मितीचे कार्य करतात. त्यामुळे चूल सांभाळून हा उद्योग सांभाळणेही शक्य झाले आहे. शिवाय, या महिला गावागावात जावून महिला आरोग्यविषयक जनजागृती करून महिलांना सॅनेटरी पॅडचा वापर करण्याचे आवाहन करत आहेत.

जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पॅड निर्मितीचे प्रशिक्षण मिळाल्याने हाताला रोजगार मिळाला. शिवाय, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जनजागृतीचीदेखील संधी मिळाली आहे. त्यामुळे शहरातच नाही, तर गावातील महिलाही आता सॅनेटरी पॅडचा उपयोग करू लागल्या आहेत.- सावित्री दीपक सोळंके,अध्यक्ष, योगीराज स्वयंसहाय्यता महिला बचत गट, व्याळा, जि. अकोला.

टॅग्स :Akolaअकोला