शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
3
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
4
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
5
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
6
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
7
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
8
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
9
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
10
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
11
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
12
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
13
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
14
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
15
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
16
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
17
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
18
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
20
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण

अनाथ, निराधारांचा स्नेह संगम सोहळा ११ नोव्हेंबरला अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:52 IST

अकोला: उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रमाच्या स्नेह संगम सोहळ्याचे आयोजन रविवार, ११ नोव्हेंबर रोजी अकोला येथे आयोजित केला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी, साध्वी ऋतुंभरादेवी, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थिती राहणार.विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्स सभागृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्नेह संगम सोहळ्याची माहिती देण्यात आली. मातृत्व जागरण सप्ताहाच्या निमित्ताने नवरात्रात ९ ते १८ आॅक्टोबरपर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

अकोला: उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रमाच्या स्नेह संगम सोहळ्याचे आयोजन रविवार, ११ नोव्हेंबर रोजी अकोला येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी, साध्वी ऋतुंभरादेवी, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, अंजनगाव सुर्जीचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे, बालहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती विहिंपचे प्रांत सेवा प्रमुख तथा गायत्री बालिकाश्रमचे सचिव गणेश काळकर यांनी दिली.विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्स सभागृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्नेह संगम सोहळ्याची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत काळकर बोलत होते. शून्य ते सहा वर्षांपर्यंतच्या निराधार अनाथ बालकांचे संगोपन व दत्तक विधानासाठी अकोला-वाशिम जिल्ह्यात एकमेव मान्यता प्राप्त उत्कर्ष शिशुगृहाचे कार्य सुरू असून, शिशूसोबतच गायत्री बालिकाश्रम ही निराधार व निराश्रित मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करीत आहे. उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रम या दोन संस्थेत २० नवजात शिशू व १०० बालिकांचे योग्य पद्धतीने संगोपन होत आहे. आठ वर्षांपासून या संस्थेच्यावतीने ८६ नवजात शिशूंना माता-पित्यांचे छत्र देऊन त्यांचे जीवन सुरक्षित व सुखकर करण्याचा प्रयत्न केला. अशा बालकांना प्रेरणादायी जीवन बहाल करणाऱ्या मान्यवरांच्या सत्काराचे भारतात प्रथमच औचित्य साधून, संस्थेच्यावतीने प्रथमच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्नेह संगम सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे काळकर यांनी सांगितले.सोहळ्याचा प्रारंभ मातृत्व जागरण सप्ताहाच्या निमित्ताने नवरात्रात ९ ते १८ आॅक्टोबरपर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन बालक दत्तक घेण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्य सोहळा रविवार, ११ नोव्हेंबर रोजी शुभमंगल कार्यालय व गोरक्षण संस्था प्रांगण गोरक्षण रोड येथे होणार आहे. देशात प्रथमच अनाथांचे स्नेहसंमेलन अकोल्यात आयोजित होत आहे. स्वागत समितीचे अध्यक्ष ब्रीजमोहन चितलांगे, खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, गोपाल खंडेलवाल, नंदू देशपांडे, मधुकर दीक्षित यांचा समावेश असल्याचे काळकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाManeka Gandhiमनेका गांधीPankaja Mundeपंकजा मुंडे