शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

वाळू घाटांचे लिलाव रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 12:58 IST

पावसाळा संपल्यानंतर नदी-नाल्यांमधील वाळू घाटांचे सर्वेक्षण तालुकास्तरीय तांत्रिक उपसमित्यांकडून अद्याप सुरू करण्यात आले नाही.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पावसाळा संपल्यानंतर नदी-नाल्यांमधील वाळू घाटांचे सर्वेक्षण तांत्रिक उपसमित्यांकडून अद्यापही सुरू करण्यात आले नाही. सर्वेक्षण प्रलंबित असल्याने वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे राज्यातील तालुकास्तरीय तांत्रिक उपसमित्यांकडून वाळू घाटांचे सर्वेक्षण केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पर्यावरणाचे संतुलन व समतोल राखण्यासह वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीच्या घटनांना आळा घालून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी ३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित वाळू धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार वाळू घाटांचे उत्खनन आणि लिलावासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय तांत्रिक उपसमितीमार्फत वाळू घाटांचे स्थळ निरीक्षण तसेच स्थानिक पर्जन्यमान व भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणविषयक अनुकूल बाबींचा विचार करून वाळू घाट उत्खननासाठी योग्य आहेत की नाही, यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समितीकडे शिफारस करणे आवश्यक आहे. तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समितीच्या शिफारशीनंतर जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीमार्फत वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येते; परंतु पावसाळा संपल्यानंतर नदी-नाल्यांमधील वाळू घाटांचे सर्वेक्षण तालुकास्तरीय तांत्रिक उपसमित्यांकडून अद्याप सुरू करण्यात आले नाही.तालुकास्तरीय तांत्रिक उपसमित्यांमार्फत वाळू घाटांचे सर्वेक्षण (स्थळ निरीक्षण) आणि उत्खननासाठी वाळू घाट निश्चित करण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया अद्याप रखडली आहे. तालुकास्तरीय तांत्रिक उपसमित्यांकडून वाळू घाटांचे सर्वेक्षण केव्हा सुरू होणार आणि वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तांत्रिक उपसमितीची अशी आहे रचना!वाळू घाटांचे स्थळ निरीक्षण (सर्वेक्षण) तालुकास्तरीय तांत्रिक उपसमितीमार्फत करण्यात येते. संबंधित तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील या उपसमितीमध्ये सदस्य म्हणून भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत नामनिर्देशित कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

वाळूचे अवैध उत्खनन-वाहतूक जोरात!वाळू घाटांचे लिलाव अद्याप करण्यात आले नाही; मात्र लिलाव न झालेल्या वाळू घाटांमध्ये वाळूचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने शासनाचा महसूल बुडत असल्याचे अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील वास्तव आहे.वाळू टंचाईत रखडली बांधकामे!डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी, वाळू घाटांचा लिलाव अद्याप करण्यात आला नाही. त्यामुळे वाळू टंचाईच्या परिस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या बांधकामांसह खासगी इमारतींची बांधकामे रखडली आहेत. त्यानुषंगाने वाळू घाटांचा लिलाव केव्हा होणार, याबाबत अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात प्रतीक्षा केली जात आहे.

तालुकास्तरीय तांत्रिक उपसमित्यांकडून जिल्ह्यातील वाळू घाटांचे सर्वेक्षण येत्या आठवडाभरात सुरू होणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू