शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

संचेतींनी स्वीकारलाच नाही विदर्भ विकास मंडळाचा पदभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:16 IST

पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले चैनसुख संचेती यांची ज्येष्ठता व पक्षातील महत्त्व सर्वश्रुत असतानाही त्यांना मंत्री पद देण्याऐवजी विदर्भ विकास मंडळ देण्यात आले; मात्र दोन महिने उलटल्यावरही त्यांनी  पदभार स्वीकारला नाही.

ठळक मुद्देशुक्रवार, १० आॅगस्ट रोजी विदर्भ विकास मंडळाची बैठक त्यांच्याऐवजी विभागीय आयुक्तांच्याच अध्यक्षतेखाली पार पडली.राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या विदर्भ विकास मंडळाला २०११ पर्यंत प्रतिवर्षी १०० कोटींचा निधी मिळत असे. आता मात्र केवळ राज्यमंत्रीपदाचा दर्जा आणि विकास कामांच्या शिफारशी करण्याचे काम मंडळाच्या अध्यक्षांना असल्यामुळे तसेही हे पद शोभेचे ठरले आहे.

- राजेश शेगोकारअकोला : भाजपा-सेनेची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशा ज्येष्ठ व दिग्गज नेत्यांची मोठी फळी भाजपाकडे होती; मात्र या नेत्यांपैकी काहींना मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत ठेवत आता सरकारच्या शेवटच्या टप्प्यात महामंडळाची जबाबदारी देण्यात आली. यामध्ये मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांचाही समावेश आहे. तब्बल पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले चैनसुख संचेती यांची ज्येष्ठता व पक्षातील महत्त्व सर्वश्रुत असतानाही त्यांना मंत्री पद देण्याऐवजी विदर्भ विकास मंडळ देण्यात आले; मात्र दोन महिने उलटल्यावरही त्यांनी  पदभार स्वीकारला नाही, त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे. शुक्रवार, १० आॅगस्ट रोजी विदर्भ विकास मंडळाची बैठक त्यांच्याऐवजी विभागीय आयुक्तांच्याच अध्यक्षतेखाली पार पडली.पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अद्याप मागास राहिलेल्या विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा जलद विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारने या विभागांसाठी विकास मंडळे स्थापन केली. या मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला, त्यामुळे मंत्रीपदापासून दूर राहिलेल्या नेत्यांना सन्मानाचे पद तसेच त्या-त्या विभागासाठी काम करण्याची संधीही मिळाली. जून २०१८ मध्ये विदर्भ विकास मंडळावर आ.चैनसुख संचेती यांची वर्णी लागली. आ.संचेती यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याला विदर्भातील प्रश्नांची चांगलीच जाण असल्यामुळे त्यांच्याकडून या पदाला पुरेपूर न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली; मात्र या दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांनी मंडळाचा पदभार स्वीकारला नाही. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या काळात नागपुरात असताना ते मंडळाच्या कार्यालयाकडे फिरकलेही नाहीत. दरम्यान, मंडळाला एका वर्षात सहा बैठका घेणे क्रमप्राप्त असल्याने १० आॅगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी नागपूर विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या कडे असलेल्या प्रभाराला मुदतवाढ देत त्यांच्याच अध्यक्षतेखालीच बैठक पार पडली.राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या विदर्भ विकास मंडळाला २०११ पर्यंत प्रतिवर्षी १०० कोटींचा निधी मिळत असे. आता मात्र केवळ राज्यमंत्रीपदाचा दर्जा आणि विकास कामांच्या शिफारशी करण्याचे काम मंडळाच्या अध्यक्षांना असल्यामुळे तसेही हे पद शोभेचे ठरले आहे; कदाचित त्यामुळेच संचेती यांनी पदभार घेतला नसावा. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही; मात्र राजकीय वर्तुळात संचेती यांची नाराजी असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMalkapurमलकापूरChainsukh Sanchetiचैनसुख संचेती