शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात बीटी कापूस बियाण्यांची विक्री सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 17:11 IST

अकोला जिल्ह्यासाठी ८ लाख पाकिटे बियाण्यांची नोंदणी करण्यात आली होती त्यापैकी ५ लाख ३३ हजार ५७६ पाकिटे प्राप्त झाली आहेत.

अकोला: कापूस बियाणे विक्रीची परवानगी ३१मे ला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु पुन्हा यात बदल करण्यात आले असून,२५ मेपासून कृषी सेवा केंद्रांना विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यासाठी ८ लाख पाकिटे बियाण्यांची नोंदणी करण्यात आली होती त्यापैकी ५ लाख ३३ हजार ५७६ पाकिटे प्राप्त झाली आहेत.जिल्ह्यातयावर्षी एक लाख साठ हजार हेक्टर वर कापूस बियाणे पेरणीचे नियोजन करण्यात आले असून.यासाठी आठ लाख बीटी कापूस बियाण्यांची नोंदणी करण्यात आली आहे.यामुळे कापूस बियाण्यांचा तुटवडा यावर्षी जाणवणार नाही असा दावा कृषी विभागामार्फत केला जात आहे .परंतु प्रत्यक्षात ५ लाख ३३ हजार ५७६ पाकिटे जिल्हयात पोहोचली आहेत.जवळपास २ लाख ६७ हजार पाकिटे हवी आहेत.यावर्षी कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने कदाचित ८ लाख पाकिटे कमी पडण्याची शक्यता आहे..यावर्षी बीजी-१ कापसाचे दर ६३५ रुपये आणि बीजी-३ या कापसाच्या पाकिटाचे दर ७३० रुपये आहेत .हे बियाणे परवानाधारक विक्रेत्याकडून उपलब्ध होणार आहेत.विक्रेत्यांनी २६ मे पासून विक्री सुरू केली आहे. परंतु शेतकरी अद्याप तरी बियाणे खरेदी साठी बाजारात येत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात कापसाचे बियाणे पाठविण्यात आले.परंतु अंत्यत कमी आहे.•

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी