शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेल्या कीटकनाशकांची जिल्ह्यात खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:07 IST

फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात अनेक शेतकर्‍यांचे  प्राण गेले आहेत. त्यामुळे, शासनाने कीटकनाशक औषधांचे नमुने घेऊन १३  औषधांच्या वापरावर बंदी घातलेली आहे; मात्र या बंदी घातलेल्यांपैकी चार ते  पाच औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचे लोकमतने २८ नोव्हेंबर रोजी  केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे.  

ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनफवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात अनेक शेतकर्‍यांचे  प्राण गेले आहेतशासनाने कीटकनाशक औषधांचे नमुने घेऊन १३  औषधांच्या वापरावर बंदी घातलेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात अनेक शेतकर्‍यांचे  प्राण गेले आहेत. त्यामुळे, शासनाने कीटकनाशक औषधांचे नमुने घेऊन १३  औषधांच्या वापरावर बंदी घातलेली आहे; मात्र या बंदी घातलेल्यांपैकी चार ते  पाच औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचे लोकमतने २८ नोव्हेंबर रोजी  केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे.  तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी, पिंजर व वाडेगाव येथे काही  औषधांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. लोकमतने एकाच वेळी  जिल्ह्यातील ११ ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करून हे उघड केले आहे. फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा  जिल्ह्यात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, शासनाने अनेक  औषधांचे नमुने घेऊन धोकादायक असलेल्या १३ औषधांवर बंदी घातली  आहे. शेतकर्‍यांच्या जीवावर उठलेल्या या औषधांच्या विक्रीवर बंदी अस तानाही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ही औषधे मिळत असल्याचे वास्तव  लोकमतने स्टिंग ऑपरेशन करून उघड केले आहे. १३ औषधांपैकी काही  औषधांची नावे बदलून विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार मूर्तिजापूर येथे  उघडकीस आला. तेल्हारा येथे औषधे नसल्याचे विक्रेते सांगत असले तरी  ओळखीच्या लोकांना या औषधांचा पुरवठा करण्यात येतो. पातुरात अनेक बंदी  असलेल्या औषधांची विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले. येथे  दुकानदारांनी शक्कल लढवून एकही औषध दुकानात ठेवलेली नाही. ही औषधे  ग्राहकाने मागितल्यास त्याला गोडावूनमधून काढून देण्यात येते. बाश्रीटाकळी येथीलही अनेक कृषी सेवा केंद्र संचालकानी औषध उपलब्ध  असल्याचे सांगितले. बाळापूर येथे बंदी असलेल्या चार औषधांची सर्रास विक्री  होत असल्याचा प्रकार स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाला आहे. पिंजर आणि  वाडेगावातही अनेक औषधे बिनदिक्कतपणे विक्री करण्यात येत आहेत. शेतकर्‍यांसाठी धोकादायक ठरलेली ही औषधे कृषी विभागाच्या आश्रीवादाने  बिनदिक्कतपणे जिल्ह्यात विकण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग  ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. जिल्हय़ातील अकोट, हिवरखेड, पारस  आणि बोरगावमंजू येथे बंदी असलेल्या औषधांची विक्री होत नसल्याचे या  स्टिंगमध्ये स्पष्ट झाले. 

येथे होते विक्री मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, पातूर, बाश्रीटाकळी, वाडेगाव, पिंजर 

येथे मिळाली नाहीत बंदी असलेली औषधे अकोट, हिवरखेड, पारस, बोरगावमंजू 

टॅग्स :Akola cityअकोला शहरagricultureशेती