शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने दिली होती ५0 हजारांची सुपारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:30 IST

पातूर : नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा छडा लावण्यात पातूर पोलिसांना ८ फेब्रुवारी रोजी यश आले. नगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने मुख्याधिकार्‍यांना मारहाण करण्यासाठी ५0 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सुपारीच्या रकमेतील २0 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पातूर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात मुख्य आरोपीसह पाच आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. 

ठळक मुद्देमुख्याधिकारी मारहाण प्रकरण पोलिसांनी २0 हजार रुपये केले जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा छडा लावण्यात पातूर पोलिसांना ८ फेब्रुवारी रोजी यश आले. नगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने मुख्याधिकार्‍यांना मारहाण करण्यासाठी ५0 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सुपारीच्या रकमेतील २0 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पातूर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात मुख्य आरोपीसह पाच आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. पातूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांना ३१ जानेवारी २0१८ रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी विविध कलमान्वये पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर संजय इंगळे व लखन डागोर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सागर रामेकर व गणेश गाडगे यांची नावे समारे आल्याने दोघांनाही पातूर पेालिसांनी गजाआड केले होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने  ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना ८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यांच्या तपासातून मुख्य आरोपी सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक हाजी सैयद बुरहान सै. नबी असल्याचे तपासात समोर आले आहे. हाजी सैयद बुरहान सै.नबी याने मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांना मारहाण करण्यासाठी ५0 हजार रुपये सागर रामेकर आणि गणेश गाडगे यांना देण्याचे कबूल केले होते. हाजी सैयद बुरहान सै.नबी याच्या अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील सॉ मिल कार्यालयात ठरलेल्या रकमेतील अर्धी रक्कम २५ हजार रुपये दोघांना देण्यात आली होती. पोलिसांनी दोघांनाही ८ फेब्रुवारी रोजी घटनास्थळावर नेऊन पंचनामा केला. तसेच त्यांच्याकडून २0 हजार रुपये जप्त केले. आरोपींनी दिलेला कबुलीजबाब, फिर्यादीने दिलेली नावे, आरोपींचे मोबाइल लोकेशन व घटनास्थळावर पोलिसांनी जाऊन केलेला पंचनामा, यावरून पातूर पोलिसांनी मुख्य आरोपीचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. मुख्य आरोपी हाजी सैयद बुरहान सै. नबी हा पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :PaturपातूरCrimeगुन्हा