शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्ती प्रदर्शनाच्या फायलीचा घोळ सुरूच; जिल्हा परिषद अध्यक्षांना माहिती देण्यास टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:23 IST

अकोला: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्वस्ती प्रदर्शनाच्या संदर्भातील माहितीच्या फाइल देण्यास अधिकारी-कर्मचाºयांनी कमालीची टाळाटाळ चालवली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या २५ लाख रुपये निधीतून स्वस्ती प्रदर्शन अकोल्यात भरविण्यात आले.प्रदर्शनाच्या संदर्भातील माहितीच्या फाइल देण्यास अधिकारी-कर्मचाºयांनी कमालीची टाळाटाळ चालवली आहे. पंधरा दिवसातही माहिती न देता जिल्हा परिषद अध्यक्षांना झुलवत ठेवण्याचा प्रकार घडत आहे.

अकोला: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्वस्ती प्रदर्शनाच्या संदर्भातील माहितीच्या फाइल देण्यास अधिकारी-कर्मचाºयांनी कमालीची टाळाटाळ चालवली आहे. पंधरा दिवसातही माहिती न देता जिल्हा परिषद अध्यक्षांना झुलवत ठेवण्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शुक्रवारी संबंधितांना दुसºयांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.अमरावती विभागातील महिला स्वयंसाहाय्यता गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने शासनाच्या २५ लाख रुपये निधीतून स्वस्ती प्रदर्शन अकोल्यात भरविण्यात आले. त्याची संपूर्ण माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी १७ फेब्रुवारी रोजी पत्रातून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मागविली. तसे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रकल्प संचालकांना दिले. त्यावर २४ फेब्रुवारी रोजीच्या दिशा समितीच्या बैठकीनंतर माहिती दिली जाईल, असा पवित्रा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाºयांनी घेतला. त्याचवेळी सहायक प्रशासन अधिकारी डॉ. वाय. बी. वंजारी यांनी २६ फेब्रुवारी रोजी माहिती दिली जाईल, असेही सांगितले होते. त्या दिवशीही माहिती देण्यात आली नाही. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस देत तत्काळ माहिती देण्याचे बजावले. त्याचाही काहीच फरक न पडल्याने शुक्रवार ९ मार्चपर्यंतही माहिती देण्यात आली नाही. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पुन्हा नोटीस बजावली. हा प्रकार म्हणजे, स्वस्ती प्रदर्शनातील काही अनियमितता दडपण्यासाठी सुरू असलेली कसरत आहे. तसेच फायलींबाबत अधिकारी-कर्मचाºयांमध्ये एकवाक्यता नसल्याने त्यामध्ये प्रचंड गोंधळ असण्याची शक्यता आहे. लेखा विभागाच्या म्हणण्यानुसार प्रकल्प संचालकांकडे फाइल सादर करण्यात आली, तर प्राप्त माहितीनुसार फाइल लेखा विभागातूनच क्लिअर झाली नसल्याचे समजते. त्यामुळे नेमका घोळ शोधण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाzpजिल्हा परिषदSandhya Waghodeसंध्या वाघोडे