शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : प्रवेशपात्र बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 14:03 IST

२७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागात पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी आणि त्यानंतर प्रवेश अशी ही प्रक्रिया आहे.निवडपात्र बालकांच्या पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी झाली नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्या व दुसºया लॉटरी पद्धतीत निवड होऊनही विहित मुदतीत ३७८ बालकांनी प्रवेश घेतले नाहीत. आता तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८८२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीत ह्यघर ते शाळाह्ण या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया ५४३ बालकांची आणि त्यानंतर दुसºया लॉटरी पद्धतीतून ३८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी आणि त्यानंतर प्रवेश अशी ही प्रक्रिया आहे. विहित मुदतीत पालकांनी पडताळणीसाठी कागदपत्रे सादर न केल्याने किंवा शिक्षण विभाग, संबंधित शाळेशी संपर्क न साधल्याने प्रवेशपात्र ९३१ पैकी ३७८ बालकांचे प्रवेश झाले नाहीत. उर्वरीत ५५३ बालकांनी प्रवेश घेतले. रिक्त जागांवर प्रवेश व्हावे यासाठी १० जुलै रोजी तिसरी लॉटरी सोडत काढण्यात आली. यावेळी २७० बालकांची निवड झाली. ११ जुलैपासून या बालकांच्या पालकांना ह्यएसएमएसह्ण पाठविले जात आहेत. एसएमएस न आल्यास शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ह्यअ‍ॅप्लिकेशन वाईज डिटेल्सह्णमध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे किंवा नाही हे पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. निवडपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून, १२ जुलैपर्यंत २७ बालकांचे प्रवेश झाले. १८ जुलैपर्यंत पडताळणी समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून, निवडपात्र बालकांच्या पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. १८ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी झाली नाही तर या बालकांना मोफत प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा