शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

अकोला जिल्हय़ातील ‘त्या’ ३00 शिक्षकांच्या वेतनासाठी ६५ लाख रुपये मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:31 AM

अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्‍या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ आणि डिसेंबर २0१७ या चार महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचे वेतन रखडल्याने, शिक्षक प्राथमिक विभागाच्या वेतन पथक अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याबाबतचे वृत्त लोकमते १५ जानेवारी रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, शासनाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना, डिसेंबर २0१७ या महिन्याच्या वेतनासाठी राज्यातील सर्वच प्लॅनमधील शिक्षकांसाठी २0 कोटी रुपये मंजूर केले. यातील ६५ लाख रुपयांचा निधी अकोल्यातील शिक्षकांसाठी देण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देतूर्तास एक महिन्याचे वेतन, उर्वरित तीन महिन्यांचे वेतनासाठी लवकरच निधी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्‍या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ आणि डिसेंबर २0१७ या चार महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचे वेतन रखडल्याने, शिक्षक प्राथमिक विभागाच्या वेतन पथक अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याबाबतचे वृत्त लोकमते १५ जानेवारी रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, शासनाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना, डिसेंबर २0१७ या महिन्याच्या वेतनासाठी राज्यातील सर्वच प्लॅनमधील शिक्षकांसाठी २0 कोटी रुपये मंजूर केले. यातील ६५ लाख रुपयांचा निधी अकोल्यातील शिक्षकांसाठी देण्यात येणार आहे. जिल्हय़ातील ५00 च्यावर शिक्षक हे नॉनप्लॅनमध्ये येतात आणि ३00 शिक्षक हे प्लॅनमध्ये आहेत. त्यामुळे या ३00 शिक्षकांना वेतनासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. त्यातही अनेकदा अन्याय होतो. वर्षातून एक किंवा दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित राहते. त्यासाठी शिक्षकांना सातत्याने प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करावा लागतो; परंतु पाठपुरावा करूनही शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या वेतनापासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शिक्षकांनी पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. यासंदर्भात लोकमतनेसुद्धा वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, शासनाने प्लॅनमधील शिक्षकांना डिसेंबर २0१६, जानेवारी, फेब्रुवारी २0१७ या तीन महिन्यांचे वेतन देण्याऐवजी केवळ डिसेंबर २0१७ या महिन्यांचे २0 कोटी रुपये वेतन मंजूर केले. त्यातील ६५ लाख रुपयांचा निधी अकोल्यातील ३00 शिक्षकांच्या वेतनासाठी देण्यात येईल. उर्वरित तीन महिन्यांच्या प्रलंबित वेतनाचे देयक अदा करण्यासाठी ब्रोकन टॅब उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ही टॅब पुणे येथील शिक्षण संचालकांनी उपलब्ध करून दिल्यानंतरच निधीची तरतूद करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणTeacherशिक्षकAkola cityअकोला शहर